शाब्बास मुंबई! गेल्या 24 तासात 5105 रूग्ण कोरोनामुक्त; तर दोन हजारापेक्षा जास्त नवीन रुग्णांची भर

मिलिंद तांबे
Saturday, 19 September 2020

मुंबईत रुग्णांचा आकडा आज ही दोन हजारच्या वर गेला असून आज 2,211 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,82,077 झाली आहे.

मुंबई : मुंबईत रुग्णांचा आकडा आज ही दोन हजारच्या वर गेला असून आज 2,211 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,82,077 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.25 टक्क्यांवरून कमी होऊन 1.24 वर खाली आला आहे. मुंबईत आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,422 वर पोचला आहे. मुंबईत आज 5,105 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 78.4 टक्के इतका झाला आहे.                                                

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली; राज्यातील महत्वपुर्ण प्रश्नांवर झाली चर्चा

मुंबईत आज नोंद झालेल्या 50 मृत्यूंपैकी 41 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 37 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 50 रुग्णांपैकी 42 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   
आज 5105 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,42,769 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 56 दिवसांवर गेला आहे. तर 18 सप्टेंबर पर्यंत एकूण 9,90,940  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.24  इतका आहे. 

Breaking : मुंबईत खासगी व सहकारी बॅंकेच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी

मुंबईत 572 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,968 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 17,336 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,361 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5105 patients corona free in last 24 hours in mumbai