१४६३ पैकी ५२७ मंडळांनाच मंडप परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम सुरू झाली आहे. आतापर्यंत मुंबईतील १४६३ पैकी ५२७ गणेशोत्सव मंडळांनाच मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. तीन दिवसांत उर्वरित मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती गुरुवारी (ता. २३) महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी दिली. 

गणेशोत्सव मंडळांसोबत आज पालिका मुख्यालयात महापौर महाडेश्‍वर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली. गणेशोत्सव जवळ आला असतानाही निम्म्याहून अधिक मंडळे अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. १४६३ मंडळांपैकी ११३२ मंडळांचे अर्ज आले आले आहेत. परंतु, आतापर्यंत त्यातील ५२७ मंडळांनाच मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. परवानगीसाठीही मंडळांना दर वर्षी विविध ठिकाणी खेटे घालावे लागतात. यंदा परवानगीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने मंडळांना विविध ठिकाणी जावे न लागता, सर्व परवाने एकाच ठिकाणी मिळतील, असे प्रशासनाने म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात महापालिकेच्या क्‍लिष्ट धोरणामुळे परवाने रखडल्याचे चित्र आहे.

Web Title: 527 ganesh mandap permission out of 1463