esakal | ठाण्यात ५४ लाखांचा सिगारेटचा साठा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यात ५४ लाखांचा सिगारेटचा साठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : गुन्हे शाखा एकने उल्हासनगर येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल ५४ लाख ३१ हजार रुपयांचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.

उल्हासनगरमधील जितेंद्र ऊर्फ जॉनी मखिजा हा त्याच्या दुकानात बंदी असलेल्या विदेशी बनावट सिगारेटची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.

हेही वाचा: रस्त्याच्या वादातून सेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; मानपाडा पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल

त्याच्याकडून तब्बल ५४ लाख ३१ हजार रुपयांचा सिगारेट साठा जप्त केला. यामध्ये विदेशी आणि हानिकारक असलेले एकूण २४१८ खोके पोलिसांनी जप्त केले. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी करीत आहेत.

loading image
go to top