esakal | 'बेस्ट'ला मिळालं तब्बल 'इतक्या' लाखांचं उत्पन्न; ६ लाख कर्मचारी करतायत प्रवास..
sakal

बोलून बातमी शोधा

best bus

बेस्ट बसमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे अडीच लाख सरकारी कर्मचारी, पालिका अधिकारी, पोलिस प्रवास करत आहेत. त्यामुळे आता तब्बल सहा लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.

'बेस्ट'ला मिळालं तब्बल 'इतक्या' लाखांचं उत्पन्न; ६ लाख कर्मचारी करतायत प्रवास..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्ट बसमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणारे अडीच लाख सरकारी कर्मचारी, पालिका अधिकारी, पोलिस प्रवास करत आहेत. त्यामुळे आता तब्बल सहा लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे. बेस्टला या सहा लाख प्रवासी वाहतुकीमुळे सुमारे 56 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी दररोज दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका बेस्ट उपक्रमाला बसला आहे. बेस्ट परिवहन विभाग अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात आहे. त्यात आणखीन काही कोटी रुपयांची भर पडून हा तोटा आणखीन वाढला आहे.

हेही वाचा: किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेअर केला पालिकेचा अहवाल

आता लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सरकारी, पालिका, पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, सफाई कामागार आदींसाठी बेस्ट बस सेवा सुरू आहे. सरकारने लॉकडाऊनमध्यें काही प्रमाणात शिथिलता आणत सर्वसामान्य जनतेसाठी बेस्ट सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता बेस्टनेही जादा बसगाड्या रस्त्यावर आणायला सुरुवात केली आहे. परिणामी बेस्टला थोडेफार आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

जोपर्यंत कोरोना पूर्णतः हद्दपार होणार नाही आणि जनजीवन सुरळीत होत नाही तोपर्यंत तरी बेस्टला आणखीन काही कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी

पालिका, पोलिस विभागात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची मुंबईपर्यंत ने - आण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या सुरू केल्या आहेत. तर बेस्टच्या २ हजार ५५७ बस गाड्या रस्त्यावर धावत होत्या. लोकल सेवा सुरू झाल्यास त्याचा परिणाम बेस्ट परिवहन विभागाच्या बस सेवेवर आणि उत्पन्नवरही होण्याची शक्यता आहे.

6 lac employees traveled by BEST bus read full story 

loading image