
गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेवर ६० विशेष फेऱ्या
मुंबई - यंदा गणेशोत्सवासाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने यापूर्वीच १९८ विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली होती. आता मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेने सुद्धा ६ ट्रेनच्या ६० विशेष फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१. मुंबई सेंट्रल-ठोकुर स्पेशल ट्रेन ६ फेऱ्या-
ट्रेन क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल-ठोकुर स्पेशल ट्रेन २२ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी दुपारी १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९वाजून ३० मिनिटांनी ठोकुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०९००२ ट्रेन २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर पर्यंत धावणार आहे.
२. मुंबई सेंट्रल-मडगाव ट्रेनच्या ३४ फेऱ्या-
ट्रेन क्रमांक ०९००३/०९००४ मुंबई सेंट्रल-मडगाव ट्रेनच्या ३७ फेऱ्या असणार आहे. ट्रेन क्रमांक ०९००३ विशेष गाडी २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान दर सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी मडगावला पोहोचेल.
३. वांद्रे टर्मिनस-कुडाळ ६ फेऱ्या
ट्रेन क्रमांक ०९०११ विशेष गाड्या २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५वाजून ४० मिनिटांनी कुडाळला पोहोचेल.
४. उधना-मडगाव ६ फेऱ्या
ट्रेन क्रमांक ०९०१८ उधना-मडगाव ट्रेन २६ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान दर शुक्रवारी आणि ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ ट्रेन ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी धावणार आहे.
५. अहमदाबाद -कुडाळ ४ फेऱ्या
ट्रेन क्रमांक ०९४११ अहमदाबाद -कुडाळ विशेष एक्स्प्रेस ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर दरम्यान दर मंगळावरी आणि ट्रेन क्रमांक ०९४१२ अहमदाबाद -कुडाळ ट्रेन ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी धावणार आहे.
६. विश्वामित्री कुडाळ ४ फेऱ्या
ट्रेन क्रमांक ०९१५० विश्वामित्री कुडाळ विशेष एक्स्प्रेस २९ ऑगस्ट आणि५ सप्टेंबर दरम्यान दर सोमवारी आणि ट्रेन क्रमांक ०९१४९ विश्वामित्री कुडाळ विशेष एक्स्प्रेस ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी धावणार आहे.
Web Title: 60 Special Trips On Western Railway For Ganeshotsav Indian Railway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..