वरळीत ६० वर्षीय पतीने पत्नीची गोळी झाडून हत्या केली. यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. रविवारी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. वरळीतील सिद्धार्थनगर परिसरात ही घटना घडली असून पतीचे नाव राजमनोहर नम्पेली आणि पत्नीचं नाव लता नम्पेली असं आहे.