पनवेलमध्ये ६०० सायकलींना गंज! दिव्यांगांसाठीच्या लाखोंच्या व्हीलचेअर, सायकली धूळ खात

Panvel Municipal Corporation : पनवेल महापालिकेने दिव्यांगांसाठी लाखो रुपये खर्चून खरेदी केलेल्या ६०० व्हीलचेअर आणि सायकली धूळ खात पडल्या आहेत.
Panvel Municipal Corporation

Panvel Municipal Corporation

ESakal

Updated on: 

नवीन पनवेल : दिव्यांगांना स्वावलंबी होण्यासाठी मदत व्हावी, त्यांना ये-जा करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने पनवेल महापालिकेने सायकली आणि व्हीलचेअर खरेदी केल्या; मात्र ज्यांच्यासाठी हे साहित्य आणले, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेच नसल्याचा आरोप होत आहे. कामोठे परिसरात सुमारे ६४० सायकली आणि व्हीलचेअर धूळ खात पडून असल्याचे समोर आले आहे. काही साहित्याला गंज लागला असून, ते खराब होण्याच्या मार्गावर आहे.

Loading content, please wait...