रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, आजपासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, आजपासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई: अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून उपनगरी रेल्वेफेऱ्यांमध्ये (लोकल) आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम  रेल्वे मार्गावर 610 अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढवणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं याबाबतची माहिती दिली.

यासोबतच एक नोव्हेंबरपासून दोन्ही मार्गावर लोकल फेऱ्याची संख्या सध्याच्या 1410 वरुन 2020 फेऱ्यापर्यंत येणार आहे.  यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर लोकलच्या 706 फेऱ्या सुरु आहे. 1 नोव्हेंबरपासून अतिरिक्त  314 लोकल चालवल्या जाणार आहे. याचबरोबर मध्य रेल्वे मार्गावर एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1020 पर्यंत जाणार आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या 704 लोकल फेऱ्या सुरु आहे. 1 नोव्हेंबरपासून 296 अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढवल्या जाणार आहे. यासोबत पश्चिम रेल्वे मार्गावर चालणाऱ्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या एक हजारावर जाणार आहे. यामध्ये 10 लेडिज स्पेशल तर 12 एसी लोकल फेऱ्यांचा समावेश असणार आहे.  सध्या 6 महिला विशेष लोकल फेऱ्यांत आणखी 4 फेऱ्या, तर वातानुकूलित लोकलच्या 10 फेऱ्यात 2 फेऱ्यांची भर पडेल. या वाढीव फेऱ्यांत सर्वाधिक 65 फेऱ्या विरार-अंधेरीदरम्यान, 43 फेऱ्या विरार ते बोरिवलीदरम्यान आणि 42 फेऱ्या बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावतील.

सध्या लोकलमध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टसिंग  पाळणे कठिण होत असल्यामुळे या फेऱ्या वाढवण्यात येत असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे. सर्व प्रवाशांनी कोविड 19 नियमावली पाळण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

610 additional local trains both railways today Total number round 2020

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com