esakal | बापरे! तब्बल 'इतके' टक्के ग्राहक शॉपिंगला उत्सुक नाहीत; ग्राहकांच्या मनात बसली कोरोनाची भीती 
sakal

बोलून बातमी शोधा

mall

कोरोनाची भीती ग्राहकराजाच्या मनात एवढी बसली आहे की आता लॉकडाऊन उठू लागला असला तरीही तब्बल  67 टक्के ग्राहक दुकानांमध्ये जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुकानदारांनीदेखील ग्राहकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे.

बापरे! तब्बल 'इतके' टक्के ग्राहक शॉपिंगला उत्सुक नाहीत; ग्राहकांच्या मनात बसली कोरोनाची भीती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाची भीती ग्राहकराजाच्या मनात एवढी बसली आहे की आता लॉकडाऊन उठू लागला असला तरीही तब्बल  67 टक्के ग्राहक दुकानांमध्ये जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. दुकानदारांनीदेखील ग्राहकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे.

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे नुकताच देशभरात चार हजार 239 ग्राहकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून वरीलप्रमाणे निष्कर्ष समोर आले आहेत. 62 टक्के ग्राहक तीन महिन्यांत दुकानात जातील, दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये ही संख्या 75 टक्के आहे. मात्र आता आम्ही कमी वेळा दुकानात जाऊ व खर्चही कमीच करू, असे 78 टक्के खरेदीदार म्हणाले. आपला शॉपिंगचा खर्च वाढेल असे फक्त सहा टक्के नागरिकांनी सांगितले. त्यामुळे गेले दोन तीन महिने तोटा सहन करणाऱ्या दुकानदारांना लॉकडाऊन उठला तरीही त्यांचा व्यवसाय लगेच जोर धरणार नसल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा: निर्बंध शिथील झाली... दुकाने ऊघडली, पण फॅशन स्ट्रीट सुना-सुनाच...

दुकानांचे नियमित निर्जंतुकीकरण व्हावे असे 75 टक्के ग्राहकांनी सांगितले तर दुकानातील कर्मचाऱ्यांशी कमीत कमी संपर्क यावा असे 57 टक्के लोकांना वाटते. खऱ्या ट्रायल रूम ऐवजी आभासी ट्रायल रुमला (संगणकामार्फत) 30 टक्के ग्राहकांनी पसंती दिली. नजीकच्या भविष्यकाळात खरेदीदार दुकानांमध्ये येण्यास नाखूष असल्याने व्यापाऱ्यांनीच आरोग्यविषयक तसेच स्वच्छताविषयक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे, असे असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणाले. 

सध्याच्या परिस्थितीत अन्नधान्य, वाणसामान व कपडे याच साहित्याच्या खरेदीला 52 टक्के ग्राहक प्राधान्य देणार आहेत. त्याखालोखाल ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्यप्रसाधने, पादत्राणे यांचा क्रम लागतो. मात्र हॉटेलिंग, प्रवास-पर्यटन आदी चैनबाजी, फर्निचर, दागिने, घड्याळे यांच्या खरेदीला शेवटचे प्राधान्य मिळाले.

मोठ्या महानगरांमधील लोकांनी प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी व ऑनलाईन खरेदी यांना सारखेच प्राधान्य दिले तर दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधील 75 टक्के ग्राहकांनी दुकानातील खरेदी पसंत केली. 45 वर्षांवरील वयाच्या 67 टक्के नागरिकांनी दुकानात जाऊन प्रत्यक्ष खरेदीची तयारी दाखवली. 

शॉपिंगबाबत किती टक्के ग्राहक आहेत इच्छुक:

लॉकडाऊननंतर शॉपिंगसाठी उत्सुक ग्राहक – 33 टक्के 
दुकानात जाण्यास फारसे उत्सुक नसलेले - 67 टक्के
येत्या तीन महिन्यांत शॉपिंग करू इच्छिणारे – 62 टक्के
तीन ते बारा महिन्यांत शॉपिंगला जाऊ पाहणारे – 32 टक्के

हेही वाचा: महापालिकेने उगारलं बडतर्फीचं हत्यार, वार्ड बॉय आणि नर्सेस ड्यूटीवर हजर...

खर्चाबाबत काय म्हणतात ग्राहक: 

खर्च वाढेल – 6 टक्के ग्राहक
खर्च तितकाच राहील – 16 टक्के
खर्च थोडा कमी होईल – 37 टक्के
खर्च पुष्कळ कमी होईल – 41 टक्के

67 percent customer are not ready to do shopin

loading image