महापालिकेने उगारलं बडतर्फीचं हत्यार, वार्ड बॉय आणि नर्सेस ड्यूटीवर हजर...

महापालिकेने उगारलं बडतर्फीचं हत्यार, वार्ड बॉय आणि नर्सेस ड्यूटीवर हजर...

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या भीतीपोटी काम थांबवलेल्या वॉर्ड बॉय आणि नर्सेस पुन्हा ड्यूटीवर हजर झाले आहेत. जे कर्मचारी ड्यूटीवर हजर राहणार नाहित त्यांना बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल या भीतीने पालिका रुग्णालयातील 700 वॉर्ड बॉय आणि नर्सेस पुन्हा कामावर रुजू झाल्या आहेत. 

गेल्या गुरुवारपासुन कोरोनाच्या भीतीने कर्मचार्यांनी काम थांबवले होते. त्यांनी आता पुन्हा मंगळवार पासून कामावर हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्तांनी गेल्या गुरुवारी कर्मचार्यांना 72 तासात पुन्हा कामावर रुजू व्हायचे आदेश दिले होते. 

सोमवारपासून केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी ही गैरहजर राहणाऱ्या आणि कोविड 19 वॉर्डमध्ये काम करण्यास नकार देणाऱ्या कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर मंगळवारी पालिकेच्या रुग्णालयात 70 टक्के कर्मचार्यांनी कामावर उपस्थिती दर्शवली असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

पालिकेच्या रुग्णालयात वॉर्डबॉय आणि नर्सेसचा तुटवडा असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. शिवाय, केईएम रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांनी वॉर्डमध्ये कोणीही वॉर्डबॉय आणि नर्सेस उपलब्ध नसून कोविड रुग्णांनी खचाखच भरलेला वॉर्ड डॉक्टरांनाच हाताळावा लागतो हे एका व्हिडिओत शुट करुन समोर आणलं होतं. 

केईएम रुग्णालयात एकूण 550 कोविड रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे मात्र, त्याही पेक्षा कमी नर्स आणि वॉर्डबॉय यांनी काम करणं थांबवले होते. अशीच परिस्थिती सायन आणि नायर रुग्णालयात ही अनुभवायला मिळत आहे. 

हा तुटवडा भरून काढण्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीवर दिवसाला 1000 रूपये मानधन देऊन कोविड वॉर्डमध्ये काम करण्यासाठी वॉर्डबॉयची नियुक्ती केली. शिवाय, 1700 नर्सेसही नियुक्त करण्यात येणार आहे.

KEM रुग्णालयाचे दिन म्हणतात, 58 नर्सेस आणि 110 वॉर्डबॉय आणि स्विपर्स मंगळवारपासून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. आता परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे. आता एकूण 180 नर्सेस आणि 300 चतुर्थ श्रेणी कामगार कोविड वॉर्डमध्ये काम करत आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये सरासरी 6 नर्स आणि 5 वॉर्ड बॉय दिले आहेत. आता एकूण 900 नर्स ऑनड्यूटी आहेत. याचबरोबर 950 चतुर्थ श्रेणी कामगारांपैकी 680 कामगार कामावर रुजू झाले आहेत. काही नर्सेस 55 वर्षांवरील आहेत, तर काही मॅटरनीटी सुट्टीवर गेल्या आहेत. तर, 51 नर्सेसनी अजून कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिलेलं नसुन त्यांना निलंबित केले जावू शकेल. गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कर्मचारी वाढले आहेत.

नायर रुग्णालयातील कर्मचार्यांची हजेरी 38 टक्क्यांवरुन 60 टक्क्यांवर पोहचली आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, ' एकूण 495 नर्सेस आणि वॉर्डबॉय यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यातील गेल्या 24 तासात 150 वॉर्ड बॉय आणि 100 नर्सेस पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. 

सायन रुग्णालयातील हजेरीचे प्रमाण 40 टक्क्यांवरुन 70 टक्क्यांवर गेली आहे. 250 पेक्षा जास्त कर्मचारी, नर्स, स्विपर कामावर आले आहेत, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

BMC to start suspension process nurses and wards boys joined hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com