

मुंबई : राज्य सरकारसाठी ‘अवजड’ होत असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा निधी वळविण्यात आला आहे. आदिवासी विभागाने ३३५ कोटी ७० लाख रुपये इतका निधी महिला व बाल कल्याण विभागाकडे वळता केला आहे. आदिवासी विभागाच्या एकूण ६७१ कोटी निधीवर महिला व बालकल्याण विभागाने डल्ला मारला आहे.