BMC: ६९५ अभियंत्यांच्या महापालिकेत बदल्या, ऑनलाइन पद्धतीने राबविली प्रक्रिया; कोणाकडे कोणता विभाग?

BMC Engineers Transfers: बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मंजुरीनंतर, मुंबई महानगरपालिकेतील ६९५ अभियंत्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत.
BMC Engineers Transfers

BMC Engineers Transfers

ESakal

Updated on: 

मुंबई : महापालिकेच्या अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मान्यतेने बदलीस पात्र असलेल्या १५२ कनिष्ठ अभियंता, ४४४ दुय्यम अभियंता आणि ९९ सहाय्यका अभियंता अशा एकूण ६९५ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी (ता. ६) पालिका प्रशासनाने दिली.

Loading content, please wait...