Palghar News : पालघर स्थानकामध्ये मालगाडीचे सात डबे घसरले; पश्चिम रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद

गुजरातकडून मुंबईकडे जाणारी मालगाडी फलाट क्रमांक दोनवरील रेल्वे रुळावरून अचानक घसरली.
7 coaches derailed in Palghar station western railway services to Mumbai stopped
7 coaches derailed in Palghar station western railway services to Mumbai stoppedSakal

पालघर : पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर मुंबईकडे जाणारी मालगाडी मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान घसरली. या घटनेचे नेमके कारण अस्पष्ट असले, तरी रेल्वे रूळ पूर्णतः उखडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक संध्याकाळी पाच वाजेपासून बंद आहे.

गुजरातकडून मुंबईकडे जाणारी मालगाडी फलाट क्रमांक दोनवरील रेल्वे रुळावरून अचानक घसरली. या घटनेत मालगाडीचे सात डबे पुढे गेले; तर उर्वरित डबे रुळावरून बाहेर फेकले गेल्याने लोखंडी कॉइल रेल्वेरुळाच्या परिसरात सर्वत्र पसरले आहेत.

त्यामुळे पालघर रेल्वे स्थानकावरून जाणारा रूळ क्रमांक दोन व तीनची वाताहत झाल्याने मुंबईकडे जाणारी सेवा खंडित झाली आहे. सध्या घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रेल्वे पोलिस, लोहमार्ग पोलिस तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत; पण या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com