सात लाख मतदारांची ऑनलाइन नोंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

मुंबई - गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनंतर आतापर्यंत राज्यात तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज केले असून, त्यापैकी सात लाखांपेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

आतापर्यंत १२ लाख ३१ हजार २७ जणांनी ऑनलाइन मतदार नोंदणी अर्ज केले असून, त्यापैकी सात लाख १७ हजार ४२७ मतदारांची नोंद यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. पात्रतेविषयी पूर्तता करू न शकलेल्या दोन लाख १८ हजार ९४८ अर्जदारांचे अर्ज अमान्य करण्यात आले. ऑनलाइन नोंदणी अर्ज करणाऱ्यांची संख्या ५५ लाख ७५ हजार आहे. ४३ लाख ५१ हजार १३० अर्ज मान्य करण्यात आले आहेत.

Web Title: 7 Lakh Voter online Registration