धक्कादायक! एकाच कुटूंबातील 7 जणांना कोरोना, परिसरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

दाटीवाटीचा परिसर असल्याने कचरा गाड्या या ठिकाणी जात नाहीत. तसेच परिसरात 72 हून अधिक सार्वजनिक शौचालय असून तेथे पालिकेच्यावतीने प्रतिदिन स्वच्छता न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कल्याण :  कल्याण पूर्व मध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच झोपडपट्टी आणि बैठ्या चाळीचा परिसर असलेल्या आनंदवाडीमधील एकाच घरात 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी स्वच्छतेच्या उपाययोजना कागदावर असल्याने आनंदवाडीची धारावी झाल्यावर पालिका प्रशासन जागी होणार का? असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहेत.

हे ही वाचा : रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

कल्याण पूर्वमध्ये आनंदवाडी परिसरात 3 हजाराच्या आसपास घरे असून मतदार यादीत जरी 13 हजार लोकसंख्या असली तरी प्रत्यक्ष मात्र 18 ते 20 हजारांची लोकवस्ती आहे. बैठ्या चाळी असणाऱ्या याठिकाणी एका घरात 7 ते 8 जण रहात आहेत. दाटीवाटीचा परिसर असल्याने कचरा गाड्या या ठिकाणी जात नाहीत. तसेच परिसरात 72 हून अधिक सार्वजनिक शौचालय असून तेथे पालिकेच्यावतीने प्रतिदिन स्वच्छता न केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान 21 मे ते 24 मे या काळात याठिकाणी 10 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यात एकाच घरातील 7 जणांचा समावेश आहे. दरम्यान मात्र कल्याण पूर्व मध्ये 231 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आनंदवाडीमध्ये वाढणाऱ्या संख्येमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

नक्की वाचा : उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातून अटक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणे महत्त्वाचे असल्याचे प्रशासन सांगत असताना पालिकाच याला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे आनंदवाडी मधील परिस्थिती इतकी भयानक होत असून धारावी सारखी परिस्थिती झाल्यावर पालिका जागी होईल का?                                                           - प्रमोद पिंगळे, माजी नगरसेवक

आनंदवाडीमध्ये वाढते रुग्ण पाहता दिवसातून 2 वेळा सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्यात येईल. तसेच रुग्ण आढळणारा परिसर  निर्जुंतीकरण व होमियोपेथी गोळ्यांचे वाटप करण्यात येईल.              - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण डोंबिवली महापालिका

7 members of the same family are corona positive Incident at Anandwadi in Kalyan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 members of the same family are corona positive Incident at Anandwadi in Kalyan