रुग्णवाहिकेअभावी 70 वर्षीय वृध्द पाऊण तास रस्त्यावर; कुठे घडला हा प्रकार? वाचा

रुग्णवाहिकेअभावी 70 वर्षीय वृध्द पाऊण तास रस्त्यावर; कुठे घडला हा प्रकार? वाचा


कल्याण:  डोंबिवली मधील कोरोना बाधित रुग्णाला रुग्णवाहिका न मिळाल्याने पायी चालत रुग्णालय गाठावे लागले, ही घटना ताजी असताना कोरोना पॉझिटिव्ह सहवासी 70 वर्षीय वृद्ध पाऊण तास रुग्णवाहिके विना रस्त्यालगत बसून राहण्याची घटना कल्याण पूर्व मध्ये समोर आली आहे.

 कल्याण पूर्वमध्ये एकाच घरात दोन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यांच्या सहवासातील वयोवृद्ध आई-वडिलांना  विलगीकरण कक्षात घेऊन जाण्यासाठी आज शनिवारी रात्री एक रुग्णवाहिका येऊन परत गेल्याने दुसरी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पाऊण तास रस्त्यालगत बसून काढावे लागले. 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीला चालता येत नसल्याने ते इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून सरपटत खाली आले. मात्र रुग्णवाहिका परत येण्यास वेळ लागल्याने त्यांना रस्त्यावरच झोपावे लागले. हा वृध्दव्यक्ती दुपारी एक वाजल्यापासून रुग्णवाहिकेची वाट बघत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तर रात्री रुग्णवाहिका आली मात्र ती निघून गेल्याने पुन्हा पाऊण तास रस्त्यावर उभे राहावे लागले. डोंबिवली घटनेची दखल घेत आयुक्तांनी  पालिकेकडे रुग्णवाहिका असल्याचा दावा करत नागरिकानां सुविधा देत असल्याचे सांगितले होते. मात्र काही तास होत नाही तोच घटना घडल्याने नागरिकामध्ये संतपाचे वातावरण आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राम बनसोडे आणि शरद शिंदे यांनी रुग्णवाहिका मागावून संबधित वृद्ध व्यक्तीला  रुग्णालयात  पाठविले. याबाबत पालिकेशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com