भीक मागणाऱ्या सासूचा मालमत्तेसाठी सुनेने केला खून; पण सासूकडे मालमत्ता होती तरी किती?

संजय घारपुरे
Saturday, 18 July 2020

मालमत्तेच्या वादातून सून अंजना पाटील आणि सासू संजना पाटील यांचे नेहमीच वाद व्हायचे. अंजनाने सत्तर वर्षीय संजना पाटील या सासूला क्रिकेट बॅटने अनेकदा मारले.

मुंबई : सासू-सुनेतील भांडणे ही काही आपल्यासाठी नवी नाही. सासूने मालमत्ता आपल्या नावावर केली नाही, म्हणून सुनेने तिला जीवे मारले. मात्र मृत झालेली सासू ही भिकारी होती. मग तिच्याकडे किती मालमत्ता असणार आणि त्यासाठी तिच्या सुनने तिचा जीव घेतला. सासूच्या मालमत्तेबाबत तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्हीही अचंबित व्हाल.

तब्बल चार दिवसांनी मिळाला बेड; वाचा कोणाबाबत घडला हा प्रकार...​

मालमत्तेच्या वादातून सून अंजना पाटील आणि सासू संजना पाटील यांचे नेहमीच वाद व्हायचे. अंजनाने सत्तर वर्षीय संजना पाटील या सासूला क्रिकेट बॅटने अनेकदा मारले. नुकत्याच झालेल्या वादातून तिला बांधूनही झोडपले. जखमी अवस्थेत संजनाबाईला लोकांनी उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणले. तिचे काही वेळातच निधन झाले. सत्तर वर्षीय संजना पाटीलच्या मृत्यूची चौकशी करताना त्यांना सुनेने मारहाण केल्याचे समोर आले. टिळक नगर पोलिसांनी केलेल्या तपासातही अंजनानेच सासूला मारल्याचे सिद्ध झाले आणि तिला ताब्यात घेतले.

आता उच्चभ्रूंच्या वस्तीत वाढतोय कोरोना; वाचा कोणते वॉर्ड ठरतायत हॉटस्पॉट... ​

चेंबूर परिसरातील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय संजनाबाईच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांनी पुतण्या दिनेशला दत्तक घेतले होते. संजनाबाईचे चेंबूरमध्ये दोन आणि वरळीत दोन फ्लॅट होते. त्यापैकी तीन फ्लॅट भाड्याने दिले होते, तर एका फ्लॅटमध्ये ती, दत्तक मुलगा दिनेश आणि त्याची पत्नी राहतात. भाड्याने दिलेल्या तीनही फ्लॅटचे पैसे सासू आपल्याकडे ठेवत असे. मात्र तरीसुद्धा संजनाबाई घाटकोपर येथील जैन मंदिरानजीक भीक मागत असे. सासूच्या मालमत्तेवरून सासू-सुनेत नेहमीच वाद व्हायचे.

'दिल बेचारा'साठी अभिनेत्री संजना सांघीने शिकली बंगाली भाषा...

दरम्यान, ज्यावेळी संजनाबाईला जखमी रुग्णालयात दाखल केले तेव्हा कुटुंबियांनी ती बाथरुममध्ये पडल्याचे सांगितले अवस्थेत आली. तिच्या शरीरावरील जखमा, गळ्यावर असलेले वळ होते. त्यामुळे डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यावर सून अंजना तपासात पुरेसे सहकार्य करीत नव्हती. पण तिच्या मुलीने आपल्या आईचे आणि आजीचे सकाळी जोरदार भांडण झाले असल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी सुनेची चौकशी केली असता आपण मालमत्तेसाठी सासूला मारल्याचे कबूल केले.
---
(संपादन : ऋषिराज तायडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 years begger woman finished by her daughter in law for the property