
लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कुरोनाविरुद्ध लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला आहे.
डिपार्टमेंटमध्ये फोफावतोय कोरोना; राज्यात एकूण 714 पोलिस कोरोना बाधीत
मुंबई - लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कुरोनाविरुद्ध लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला आहे. राज्यात आता एकूण 714 पोलिस कोरोनााधीत आहेत. एकट्या मुंबईत 309 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलिस कर्मचा-यांचा मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 81 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत पाच पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 61कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले असून सध्या 648 पोलिसांवर कोरोनावर उपचार घेत आहेत.
धक्कादायक ! ऑफिसने दिलेल्या इंटरनेट डोंगलचा घरात सुरु आहे 'असा' वापर
मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचा-यांसह पोलिस अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलिसांनाही विळखा घातला आहे. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन पोलिस आयुक्तलयात सुरू करण्यात आली आहे. त्यावर बहुतांश पोलिस व कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्यात येणा-या अडचणीबाबत तक्रार केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलिसासाठी सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आईशी भांडण झालं, घरातून चाकू घेऊन 'तो' निघाला आणि म्हणाला "आज कुणालातरी संपवतोच..."
या ठिकाणी जवळपास 300 बेडची व्यवस्था केली गेली आहे. याशिवाय पोलिस ठाण्याच्या पातळीवर मुंबईबाहेर राहणा-या पोलिसांची राहण्याची सुविधा करण्याबाबतही प्रक्रिया सुरू असून पोलिस ठाण्यात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मरोळ येथेही अशाच पद्धतीने एका इमारतीचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. तसे झाल्यात तेथेही 250 बेड्स कोरोनाबाधीत पोलिसांसाठी उपलब्ध होतील.
714 police officers and worker detected positive in maharashtra read full story
Web Title: 714 Police Officers And Worker Detected Positive Maharashtra Read Full Story
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..