भयंकर ! जेलमध्ये घुसला कोरोना, आर्थर रोड कारागृहातील 72 कैद्यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

सात गार्डही कोरोना पॉझीटीव्ह

मुंबई - आर्थर रोड कारागृहातील 72 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. याशिवाय सात गार्डना कोरनाची लागण झाली आहे. आर्थर रोड कारागृहातील एक 50 वर्षीय कैदी व दोन गार्डला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सुमारे 150 अधिकारी व कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहातील कोरोना बाधीतांसाठी सेट जॉर्ज व जीटी रुग्णालयात स्वतंत्र विलीगीकरण व उपचार यंत्रणा कक्ष उभारण्यात येणार आहे. आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर आर्थर रोड कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले होते.

रात्री १० वाजता अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना का केला फोन ?

या कारागृहात 800 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात 2700 कैदी आहेत. त्यातील 400 कैद्यांना बाँडवर सोडण्यात आले असून 300 कैद्यांना नवी मुंबई येथील तळोजा रुग्णालयात हलवण्यता आले आहे. त्यातील आर्थर रोड कारागृहातील 50 वर्षीय कैद्याला कोरोनाची लागण झाली असून अंमली पदार्थ तस्करी व हत्येतील संशयीत आरोपीला  नोव्हेंबर महिन्यात या कैद्याला आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले होते. याशिवाय भायखळा येथील गेस्ट हाऊसमध्ये तैनात दोन गार्डनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यानाही विलग करण्यात आले होते.

राज्यातील लॉकडाऊन करण्यात आलेल्या काही कारागृहांपैकी आर्थर रोड तुरुंग असून दोन दिवसांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका सारखा आल्यामुळे आल्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात उपारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याला कोरोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाले. 

हा रुग्ण सापडलेला वॉर्ड कन्टेंन्मेंट करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्व कैद्यांच्या वैद्यकीय चाचणीला सुरूवात करण्यता आली आहे. त्यात काही गँगस्टर्सचाही समावेश आहे. त्याला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच 150 व्यक्तींचा कोरोना स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 72 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात कर्मचारी व कैद्यांचाही समावेश आहे. कारागृहातील एका स्वयंपाकीमुळे इतर कैद्यांना त्याचा संसर्ग झाल्याचा संशय आहे.

तुमचा पगार 30 हजारपेक्षा कमी आहे, मग 'ही' आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी

पण या स्वंयपाकीला कशामुळे कोरोना झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याशिवाय सात गार्डही कोरोना पॉझीटीव्ह आले असून त्यात भायखळा गेस्ट हाऊसमधील दोन गार्डचाही समावेश आहे. हे सर्व कैदी व गार्ड यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही. सर्व कैद्यांसाठी सेंट जॉर्ज व जी.टी रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीत 5 हजार 105 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून 582 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तळोजा कारागृातून 498, ठाणे कारागृहातून 443 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे . असेच पुढेही टप्याटप्याने 11 हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. राज्यातील आठ कारागृहांमध्ये पूर्णपण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

72 prisoners of arther road jail found corona positive read full report

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72 prisoners of arther road jail found corona positive read full report