Video : ७२ वर्षांच्या आजींचा कडक डान्स; 'हा' SWAG पाहाल तर येडे व्हाल...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

मुंबई - देशातच नाही तर जगभरात व्हॅलेंटाईन वीक साजरा झाला आणि आज अखेर व्हॅलेंटाईन डे देखील आला. अशातच तरुणाई आणि सोशल मीडियाचं विशेष प्रेम दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतंय. यामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब आदी समाज माध्यमंतर आहेतच, मात्र या सर्वात आवडता कोणता प्लॅटफॉर्म असेल तर तो आहे टिक टॉक.. शहरातच नाही तर गावा-गावात देखील या 'टिक टॉक'ची क्रेज दिवसेंदिवस वाढत जातेय. अशातच याच तरुणाईला वेड लावणाऱ्या 'टिक टॉक'वर एका आजीबाईंनी धुमाकूळ घातलाय. टिक टॉकच्या ट्रेंडिंगमध्ये या आजीबाईंच्या बोलबाला पाहायला मिळतोय.  

मोठी बातमी -  ते आले.. अन् अश्लील चाळे करत त्यांनी आमच्यासमोरच हस्तमैथून केलं.. 

या आजींचं वय आहे तब्बल ७२ वर्ष. मात्र या आजींनी जे काही ठुमके लागवलेत, ते पाहून तरुणांना देखील बोटं तोंडात घालावी लागतील. या आजींच्या 'हाय रे फोटो' या गाण्यावरील डान्सला दीड लाखांपेक्षा जास्त नेटिझन्सने लाईक केलंय. हा व्हिडीओ तब्बल २.८ मिलियन म्हणजे २८ लाखांपेक्षा अधिकवेळा पहिला गेलाय.  या आजींचा  Swag पाहाल तर तुम्ही पण म्हणाल क्या बात हैं..     

@uservhbpeqqh2t

 Moto by Ajay Hooda Dilerkharakiya - Diler Kharkiya

मोठी बातमी - नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...

Mahesh M (@uservhbpeqqh2t) नामक एका युझरने टीक टॉकवर या आजींचे आणखीन काही व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. या आजीबाईंना तब्ब्ल १८.७ हजार लोकं फॉलो करतात. या आजींचे व्हिडीओ whatsapp च्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात शेअर केले जातायत. 

72 years old lady viral on tik tok after her dance on hay re tera photo

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72 years old lady viral on tik tok after her dance on hay re tera photo