रेल्वेसाठी ७५ हजार कोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 जानेवारी 2019

या सेवांचे उद्‌घाटन...
 दिवा-पनवेल-रोहा आणि पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजरचा विस्तार
 पनवेल स्थानकातील सुविधा, पश्‍चिम मार्गावरील स्थानकांच्या २१ स्थानकांवर ४० नवी एटीव्हीएम यंत्रे 
दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण स्थानकांवरील प्रकाश सुविधा
दिवा-वसई पूल, पेण-रोहा रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण 

मुंबई  - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी दिली. 

सीएसएमटी येथून सुटणाऱ्या हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेसला गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या वेळी ते बोलत होते. केंद्र व राज्य सरकार म्हणजे ‘डबल इंजिन’ आहे. त्यामुळे विकासात्मक कामे जलद गतीने होत आहेत. १०० टक्‍के विद्युतीकरण असलेले मुंबई रेल्वे मंडळ पहिले आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण केले जाईल, अशी माहितीही या वेळी गोयल यांनी दिली. 

या सेवांचे उद्‌घाटन...
 दिवा-पनवेल-रोहा आणि पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजरचा विस्तार
 पनवेल स्थानकातील सुविधा, पश्‍चिम मार्गावरील स्थानकांच्या २१ स्थानकांवर ४० नवी एटीव्हीएम यंत्रे 
दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण स्थानकांवरील प्रकाश सुविधा
दिवा-वसई पूल, पेण-रोहा रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण 

Web Title: 75 thousand crores for the Railways