Aadhaar Activation: दोन वर्षे आधारसाठी चकरा; राजदंड हातात घेऊन तहसील कार्यालयात धडक, ७७ वर्षीय जयराम वळवींचा लढा यशस्वी

77 Year Old Tribal Man Gets Aadhaar After Two Year Struggle: दोन वर्षांच्या सरकारी दिरंगाईनंतर ७७ वर्षीय आदिवासी जयराम वळवींचा ठिय्या; राजदंड हातात घेऊन तहसील कार्यालयात ठाम उभे राहिल्यानंतर काही तासांत आधार कार्ड सक्रिय
Jayram Valvi Aged 77 Fights For Aadhaar Activation After Two Years And Finally Gets Relief From Vasai Administration

Jayram Valvi Aged 77 Fights For Aadhaar Activation After Two Years And Finally Gets Relief From Vasai Administration

esakal

Updated on

विरार : कधीकाळी वेठबिगारीच्या जोखडात अडकलेले आणि श्रमजीवी संघटनेच्या संघर्षातून मुक्त झालेले ७७ वर्षीय आदिवासी जयराम वळवी यांनी पुन्हा एकदा आपल्या हक्कासाठी संघर्ष केला. गेली दोन वर्षे आधार कार्ड सक्रिय करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याने अखेर त्यांनी हातात राजदंड घेत आपल्या दोन मुलांसह तहसील कार्यालय गाठले. “आधार कार्ड सक्रिय झाल्याशिवाय येथून उठणार नाही,” असा निर्धार केल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा हलली आणि आज सकाळी दहा वाजण्याच्या आत त्यांचे आधार कार्ड सक्रिय झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com