बापरे! तब्बल 'इतके' टक्के इंजिनिअरिंग पदवीधरांना नोकरीच नाही; धक्कादायक आकडेवारी आली समोर.. 

convocation
convocation

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश संस्थांनी भरती प्रक्रिया थांबवत कर्मचारी कपात सुरू केली आहे. यामुळे नव्याने इंजिनिअर झालेल्या पदवीधारकांना संधी शोधत असताना योग्य वेळेत नोकरी मिळवण्यात अडचणी येत आहेत. पदवी प्राप्त करून कित्येक वर्ष होऊनही या पदवीधारकांना नोकरी मिळू शकत नाहीये. त्यात आता एका सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.   

एक तृतीयांशांपेक्षा जास्त इंजिनिअरिंग पदवीधरांना नोकरीची चिंता आहे असं इन्क्युबेशन लॅब ब्रिजलॅब्ज सोल्युशन या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून  निदर्शनास आले आहे. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमधील 1 हजार विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

देशभरात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 76 टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये सक्रिय प्लेसमेंट विभाग असल्याचे कबूल केले आहे. यातील एक पंचमांशांपेक्षा जास्त म्हणजे 24 टक्के विद्यार्थ्यांनी त्याद्वारे नोकरी मिळण्याकरिता ते पात्र असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे असे सूचित होते की, तब्बल 78.64 टक्के विद्यार्थ्यांकडे सध्या कोणतीही नोकरीची संधी नाही. 

सर्वेक्षणानुसार 35.48 टक्के नोकरी शोधणारे इंजिनिअर्स वेळेवर नोकरी लागण्याबाबत चिंतेत आहेत. विशेष म्हणजे सर्वेला प्रतिसाद दिलेल्यांपैकी 26.96 टक्के पदवीधारकांनाच त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांच्या बळावर अपेक्षित पॅकेज मिळण्याचा आत्मविश्वास आहे. नोकरी शोधणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनुभवात्मक शिक्षणासह कौशल्य महत्त्वाचे आहे, हेदेखील आकडेवारीवरून दिसून येते.

78 percent engineer graduates do not have jobs in India 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com