
मुंबई : गेल्या चार वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत 78.75 टक्के वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 2018 मध्ये 1,026 चिकनगुनियाचे रुग्ण होते जे आता 13 ऑक्टोबरपर्यंत वाढून 1,834 वर पोहोचले आहेत. तर, 2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे 298 आणि 782 रुग्णांची संख्या नोंदली गेली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिकनगुनियाचे रुग्ण वाढण्यामागे बरीचशी कारणे आहेत. अवेळी आणि अधिकचा पडणारा पाऊस ज्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. शिवाय, तज्ज्ञांच्या मते, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दीर्घकाळ पाऊस पडणे. या व्यतिरिक्त प्रशासनाने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो उपक्रम राबवला पाहिजे त्याचा आता अभाव आहे.
राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या म्हणण्यानुसार, आकडेवारीनुसार डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पावसाचा दीर्घ कालावधी हे एक कारण आहे. मात्र, ही बाब आपण टाळू शकत नाही. प्रशासन आणि जनता या दोघांच्या समन्वयाने ही समस्या बऱ्याच अंशी नियंत्रित केली जाते. लोकांनी स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, पाण्याकडे नाही. प्रशासनाला सहकार्य करा आणि आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी घ्या.
ताप, पुरळ, डोकेदुखी आणि मळमळ यांच्या तक्रारी असलेल्या रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. चिकनगुनियाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे सांध्यातील तीव्र वेदना जे वृद्ध लोकांमध्ये एक वर्षांपर्यंत टिकून राहते. रुग्णाला खूप जास्त ताप आणि तीव्र सांधेदुखी जाणवतात. त्यांची हालचाल होऊ शकत नाहीत. शिवाय, चिकनगुनियाची बहुतेक लक्षणे कोविड -19 आणि डेंग्यू सारखीच असतात. दरम्यान, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे असे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
मुंबईत 30 रुग्णांवर उपचार -
मुंबई महापालिकेने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 1 जानेवारी ते 10 ऑक्टोबरपर्यंत चिकनगुनियाच्या 30 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत 10 रुग्ण नोंदले गेले आहेत. दरम्यान, मुंबईत या आधी 2019 आणि 2020 मध्ये एकही चिकनगुनियाच्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, डासांची घरातील पैदास रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून अळीच्या प्रजननास प्रतिबंध केले पाहिजे. ताप, डोकेदुखी, पुरळ, स्नायू आणि सांधेदुखीचा इतिहास असल्यास स्वत: च औषधे घेऊ नका आणि जवळच्या वैद्यकीय व्यवसायिकांचा सल्ला घ्या. उपचारात विलंब होऊ नये कारण यामुळे गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.