esakal | मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये १८.५८ % वाढ | corona active patients
sakal

बोलून बातमी शोधा

 corona active patients

मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये १८.५८ % वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत (Mumbai) आठवड्याभरात सक्रिय रुग्णांमध्ये (Active patient) १८.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरातील दैनंदिन बाधितांची (corona patients increases) सध्या वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. सक्रिय रुग्णांच्या यादीत राज्यात चौथ्या क्रमांकावर असणारी मुंबई आता दुसऱ्या स्थानी पोहचली आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण; सिनेटमध्ये गदारोळ

मुंबईबाहेरील नागरिकांचे येणे वाढल्याने रुग्णवाढ झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २८ सप्टेंबरला मुंबईत ५,०५३ सक्रिय रुग्ण होते. ६ ऑक्टोबरला सक्रिय रुग्णांचा आकडा ६,१६१ वर पोचला. आठवड्याभरात सक्रिय रुग्णांमध्ये तब्बल १८.५८ टक्के वाढ झाली. मुंबईत २४ तासांत ५,८८३ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले गेले.

त्यातील ४,१२० (७० टक्के) हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत. १,७६३ (३० टक्के) लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत. बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक असल्याचे दिसते. सध्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ०.०६ इतका आहे. मुंबईतील पाच विभागांत रुग्णवाढ होत आहे. त्यामध्ये एफ उत्तर ०.०९, एफ दक्षिण ०.०९, ए के पश्चिम ०.०८ आणि एच पश्चिम ०.०८ यांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्ण
पुणे ः ८,५९३
मुंबई ः ६,१६१
नगर ः ४,२८०
ठाणे ः ३,७५०
सातारा ः १,८९८

loading image
go to top