अथर्व शिंदे मृत्यू प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

मुंबई - बहुचर्चित अथर्व शिंदे याच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांविरोधात आरे पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीत 27 जणांनी अमली पदार्थ घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून, कोणालाही अटक झालेली नसल्याचे आरे पोलिसांनी सांगितले.

अथर्व हा पोलिस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा होता. 7 मे रोजी तो मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह आरे कॉलनीजवळ जंगलात सापडला होता. या प्रकरणी आरे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: 8 people crime by atharv shinde death case

टॅग्स