Badlapur Municipality: बदलापूर पालिकेची ८१ लाखांची फसवणूक! कंत्राटदारावर गुन्हा दाखल

Badlapur Municipality : या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Money
MoneySakal

बदलापूर, ता. २८ (बातमीदार) : धूरफवारणी कामाच्या निविदा प्रक्रियेत खुद्द ठेकेदारानेच बनावट अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करत कुळगांव बदलापूर नगरपरिषदेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने डिसेंबर २०२० मध्ये शहरात डास प्रतिबंधक धूरफवारणी करण्यासाठी तीन वर्षांकरिता ई निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे समर्थ पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस पालघर, मे. एव्हरग्रीन पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कल्याण, मे. विघ्नहर पेस्ट कंट्रोल पुणे, मे. बेस्ट पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस नवी मुंबई, व मे. शुभम महिला विकास मंडळ ठाणे या कंपन्यांच्या निविदा पात्र करण्यात आल्या होत्या.

यातील शुभम महिला विकास मंडळ ठाणे यांना हा ठेका देण्यात आला. कारण या कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रात ठाणे महापालिकेचा तीन वर्षांचा धूरफवारणी अनुभव असलेला दाखला जोडला होता; मात्र यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सदर संस्थेने सादर केलेला ठाणे महापालिकेचा अनुभवाचा दाखला हा बनावट असल्याचा आरोप केला.

त्यानंतर याबाबत सखोल चौकशी या कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याकडे अर्ज सादर करून केली. त्यानुसार प्राथमिक चौकशीत ठेकेदाराने सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राची ठाणे महापालिका आयुक्त यांच्याकडून फेरतपासणी करण्यात आली.

या सगळ्या प्रकरणावर नगरपरिषदेकडे सुनावणी घेतली असता, सदर संस्थेने निविदेसोबत सादर केलेले धूरफवारणी अनुभव प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com