बापरे ! कोरोनाबाधिताच्या संपर्कामुळे हिंदुजातील ८२ कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरस  थैमान घालत आहे. जगात तब्बल ४००० पेक्षा जास्त लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे. डॉक्टरांना अद्याप कोरोनावर औषध मिळालं नाहीये. मुंबईतही कोरोनाचे ४ रुग्ण आढळले आहेत. त्याच पार्श्वाभूमीवर हिंदुजा रुग्णालयातील तब्बल ८२ कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरस  थैमान घालत आहे. जगात तब्बल ४००० पेक्षा जास्त लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे. डॉक्टरांना अद्याप कोरोनावर औषध मिळालं नाहीये. मुंबईतही कोरोनाचे ४ रुग्ण आढळले आहेत. त्याच पार्श्वाभूमीवर हिंदुजा रुग्णालयातील तब्बल ८२ कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

याचं कारण ऐकलं तर तुम्हाला धडकी भरेल. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका रुग्णाला ठेवण्यात आलं होत. काही दिवसांनी हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं पुढे आलं. रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समजताच हिंदुजातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जामी सरकली. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेय सर्वांना आता क्वारंटाईन करण्यात आलंय. आपल्या घरातच आपण कुणाच्याही संपर्कात न येता राहावं असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.  

हेही वाचा: तुमचा दररोजचा ऑक्सिजन म्हणजेच मोबाईल डेटा 'इतक्या' पटीनं महागणार...  
 
रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिकेचे चालक आणि इतर काही कर्मचारीवर्ग सतत रुग्णांच्या सेवेत असतात. रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या संपर्कात हे कर्मचारी असतात. रुग्णांना योग्य ते उपचार मिळावे म्हणून हे कर्मचारी सतत तत्पर असतात. मात्र आता  या कर्मचाऱ्यांनाही कोरोना होण्याची जास्त भीती आहे. असाच एक कोरोना झालेला रुग्ण हिंदुजा रुग्णालयात आला आणि त्यामुळे इथल्या हॉस्पिटल प्रशासनाला ८२ कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली ठेवावं लागलंय.  

एका कोरोनाग्रस्त रुग्णानं हिंदुजा रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यामुळे या रुग्णालयातले नर्स, डॉक्टर, अतिदक्षता विभागातील कर्मचारी आणि काही रुग्णांना आता देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. यातील ७४ रुग्णांना त्यांच्याच घरी स्वतंत्र ठेवण्यात आलंय. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कर्मचाऱ्यांना हिंदुजा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. 

हेही वाचा: 'सरोगसी' म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या डिटेल्स.. 

पुढे १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आहे. त्यांच्यात काही कोरोनाची लक्षणं आढळतात का हे बघण्यात येणार आहे. तसंच त्या ८ हाय रिस्क रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यात येणार आहे. 

82 employees of Hinduja hospital are under observation in mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 82 employees of Hinduja hospital are under observation in mumbai read full story