'सरोगसी' म्हणजे काय रे भाऊ ? जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून एक शब्द तुमच्या नेहमी कानावर पडत असेल तो म्हणजे 'सरोगसी'. शिल्पा शेट्टीला सेलिब्रिटीला आई होण्याचं सुख नुकतंच प्राप्त झालं हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र तिनं सरोगसीचा माध्यमातून आई होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय हेही तुम्हाला माहितीच आहे. मात्र सरोगसी म्हणजे नक्की काय ? सरोगसी का केली जाते ? सरोगसी करण्याची कारणं कोणती? अशा प्रकारचे कतुहुल निर्माण करणारे प्रश्न तुम्हाला पडले असतील. मात्र सरोगसी म्हणजे काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून एक शब्द तुमच्या नेहमी कानावर पडत असेल तो म्हणजे 'सरोगसी'. शिल्पा शेट्टीला सेलिब्रिटीला आई होण्याचं सुख नुकतंच प्राप्त झालं हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र तिनं सरोगसीचा माध्यमातून आई होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय हेही तुम्हाला माहितीच आहे. मात्र सरोगसी म्हणजे नक्की काय ? सरोगसी का केली जाते ? सरोगसी करण्याची कारणं कोणती? अशा प्रकारचे कतुहुल निर्माण करणारे प्रश्न तुम्हाला पडले असतील. मात्र सरोगसी म्हणजे काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हेही वाचा: लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' वादाच्या भोवऱ्यात: वाचा काय आहे प्रकरण 

काय आहे सरोगसी ?..... 

सोप्या शब्दात सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचं गर्भाशय भाड्यानं घेऊन तिच्या मदतीनं अपत्य जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूळ प्राप्त होऊ शकतं. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही. मात्र त्यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय असतो. 

सरोगसीचे प्रकार: 

सरोगसीमध्ये आई-वडील होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यापैकी पुरुषाचं स्पर्म बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या एग्ग्ससोबत मॅच केलं जातं याला 'ट्रेडिशनल सरोगसी' म्हणतात. 
दाम्पत्याचे स्पर्म आणि एग्स टेस्ट ट्यूबमध्ये मिसळून बाळाला जन्म  देणाऱ्या महिलेच्या गर्भाशयात इन्सर्ट करण्यात येतात याला 'जेस्टेशनल सरोगसी' म्हणतात. त्यामुळे बाळाला प्रत्यक्ष जन्म देणारी महिला वेगळी असते. या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हंटल जातं.  

हेही वाचा: कोरोनामुळे अडलं हापूसचं घोडं...वाचा काय झालंय... 

सरोगसीमध्ये ज्यांना मूल हवं आहे अशा दाम्पत्यात आणि सरोगेट मदरमध्ये एक करार केला जातो. ज्यानुसार मूल जन्माला आल्यानंतर त्या बाळाचं पालकत्व त्या दाम्पत्याचं असतं. मात्र मूल होतपर्यंत संपूर्ण ९ महिने सरोगेट मदरची काळजी घेण्याची जबाबदारी त्या दाम्पत्याची असते. मात्र सरोगेट मदर होण्यासाठी त्या महिलेकडे फिट असल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तसंच दाम्पत्याकडेही ते मूल जन्माला घालण्यासाठी फिट नाहीत असं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. 

भारत सरकारकडून सरोगसीबद्दल कडक नियम करण्यात आले आहेत. संपूर्ण कायद्याचं पालन करूनच सरोगसी करण्याचे आदेश सरकारकडून डॉक्टरांना देण्यात आले आहेत.

कोण आहेत सरोगसी पालक:

  • शिल्पा शेट्टी: पहिल्या अपत्यानंतर शिल्पा शेट्टीनं दुसरं मूल सरोगसीच्या माध्यमातून प्राप्त केलंय. 
  • आमिर खान: अमीर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद खान हा सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. 
  • शाहरुख खान: शारुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा अब्राम खान हा सरोगसीचा माध्यमातून झाला आहे. 
  • करण जोहर: कारण जोहरचे मुलं यश आणि रुही हे आयव्हीएफच्या माध्यमातून झाले आहेत. 
  • तुषार कपूर: तुषार कपूर याचा मुलगा लक्ष्य हा ही सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. 

हेही वाचा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिम,नाट्यगृह,सिनेमागृह,जलतरण तलाव राहणार बंद-मुख्यमंत्री

त्यामुळे जर तुम्ही आई-वडील होऊ शकत नसाल तर जरूर सरोगसीचा पर्याय निवडा मात्र यासंदर्भात डॉक्टरांना नक्की विचारा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. 

what is Surrogacy read all information about surrogacy 
       


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is Surrogacy read all information about surrogacy