अबब! राज्यात लॉकडाऊन उल्लंघनाचे 89 हजार गुन्हे दाखल, वाचा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या नियमाच्या उल्लंघनाचे 89 हजार 383  गुन्हे राज्यात दाखल झाले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या नियमाच्या उल्लंघनाचे 89 हजार 383  गुन्हे राज्यात दाखल झाले आहेत. या प्रकरणांत एकूण 17 हजार 813 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचाएसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटी चालकच बनला देवदूत, जीवावर उदार होऊन अशी करताय मदत

लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक 14 हजार 220 गुन्हे पुण्यात दाखल करण्यात आले. मुंबई पोलिसांनी 10 हजार 490 गुन्हे नोंदवले. ठाण्यात 1625 आणि नवी मुंबईत 537 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. रायगडमध्ये 402, तर पालघरमध्ये 990 गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे ग्रामीण पोलिसांनी 711 गुन्हे दाखल केले. वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नक्की वाचा : काय सांगता ! सोन्याच्या बांगड्या नाही तर प्रवासी बॅग घेऊन चोरट्यांचा पोबारा...

राज्यभरात पोलिस विभागाच्या 100 या क्रमांकावर 82 हजार 128 दूरध्वनी आले. पोलिसांनी हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का असलेल्या 628 व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात पाठवले. अवैध वाहतूक करणाऱ्या 1242 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांविरोधात व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

89,000 cases of lockdown violation filed 17 thousand 813 people arrested in the state


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 89,000 cases of lockdown violation filed 17 thousand 813 people arrested in the state