दोन दिवसात 4 कोटींचे 9 किलो सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने गेल्या दोन दिवसांत तस्करीच्या सहा प्रकरणांमध्ये एकूण 4.53 कोटी रुपयांचे 9.1 किलो सोने जप्त केले.

दोन दिवसात 4 कोटींचे 9 किलो सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने गेल्या दोन दिवसांत तस्करीच्या सहा प्रकरणांमध्ये एकूण 4.53 कोटी रुपयांचे 9.1 किलो सोने जप्त केले.

पहिल्या प्रकरणात, दुबईहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 2.14 कोटी रुपयांची 4.5 किलो सोने जप्त करण्यात आली होती. दुसऱ्या जप्तीमध्ये, एका फ्लाइटमधून 1.4 किलो वजनाचे आणि 72.79 लाख रुपये किमतीचे 24 कॅरेट सोन्याचे बार जप्त करण्यात आले. तिसर्‍या प्रकरणात अधिकाऱ्यांनी 18.90 लाख रुपयांचे 365 ग्रॅम सोने जप्त केले. चौथ्या घटनेत एका प्रवाशाने ट्रॉली बॅगच्या चाकात 36.28 लाख रुपये किमतीच्या 699.20 ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या तस्करी केल्याचे आढळून आले.

पाचव्या प्रकरणात एका प्रवाशाकडून 42.28 लाख रुपये किमतीचे 816 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कट्टे जप्त करण्यात आले. शेवटच्या प्रकरणात, एका प्रवाशाकडून 1.3 किलो वजनाचे 68.09 लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले.

टॅग्स :crimegoldMumbaiAction