घातपाती कारवायांच्या तयारीत असलेल्या 9 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई : इसिस दहशतवादी संघटनेशी प्रेरित होऊन घातपाती कारवायांच्या तयारीत असलेल्या 9 संशयीतांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अटक केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा सामावेश आहे. "इसिस' या दहशतवादी संघटनेशी प्रेरित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संशयितांचा संबंध असल्याचे समजते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही अतिशय महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. 

"एटीएस'ने मंगळवारी मुंब्य्रातील कौसा, अमृतनगर येथून चार जणांना; तर औरंगाबादमधून पाच जणांना अटक  करण्यात आली आहे. आठ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सर्व संशयित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे मुंब्य्रातून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्टही केल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र एटीएसकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

औरंगाबादेतून याची सूत्रे हाताळणी जात होती. सर्व संशयित अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होते. त्यानुसार प्रथम औरंगाबादमधून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. औरंगाबादेतील सलमान नावाच्या एका संशयिताशी संबंध असल्याच्या संशयावरून ठाण्यातील मुंब्रा परिसरात छापे घालून मोहम्मद मजहर शेख, मोहसिन खान, फहाद शाह यांच्यासह आणखी एका 17 वर्षाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिंधक याद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रसायने, मोबाईल, लॅपटॉप, चाकू आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: 9 people arrested for militant activities from Mumbra and Aurangabad