esakal | आता सादिकचा गेमच करतो म्हणत नवनीत पहाटे चार वाजता गेला सादिकच्या घरी, सादिकने दरवाजा उघडला आणि....
sakal

बोलून बातमी शोधा

आता सादिकचा गेमच करतो म्हणत नवनीत पहाटे चार वाजता गेला सादिकच्या घरी, सादिकने दरवाजा उघडला आणि....

लॉकडाऊनचा काळ सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नवनीत आणि त्याच्या भावाने  सादिक आणि त्याच्या भावाला तोंडाला मास्क लावण्यास सांगितलं होतं.

आता सादिकचा गेमच करतो म्हणत नवनीत पहाटे चार वाजता गेला सादिकच्या घरी, सादिकने दरवाजा उघडला आणि....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्हयांचं प्रमाण वाढल्याचं एका माहितीतून समोर आलंय. अशातच याचीच प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना मुंबईत घडलीये. मुंबईतील चेंबूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील चेंबूर या भागात, चेंबूर स्टेशनजवळील पी वाय थोरात मार्गाजवळ चार जणांनी चक्क एका व्यक्तीच्या घरात घुसून गोळीबार केलाय. या भीषण घटनेनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

मोठी बातमी मुंबईतल्या सोसायट्यांना पालिकेनं म्हटलं, तयार राहा! कारण...

शुल्लक कारणातून केला घरात गोळीबार :       

लॉकडाऊनचा काळ सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नवनीत आणि त्याच्या भावाने  सादिक आणि त्याच्या भावाला तोंडाला मास्क लावण्यास सांगितलं होतं. मात्र सांगितलेलं ऐकलं नाही म्हणून त्यांच्यात वाद झुरू झाला आणि या वादाने पुढे भीषण रूप धारण केलं. सादिक आणि इतरांनी नवनीत आणि त्याच्या भावावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. सादिक खानचा नवनीतवर राग होता.

मोठी बातमी -  १९४० आधी न्यूमोनियावर जसे उपचार व्हायचे तसे उपचार आता कोरोनासाठी? सुरु आहे मोठं संशोधन...

दरम्यान नवनीत पहाटे चार वाजता सादिकच्या घरी पोहोचला. नवनीत स्वतःसोबत आणखी तिघांना घेऊन आला होता. सादिकने दार उघडताच आपल्याकडील हत्यारांनी त्याने गोळ्या झाडून तो तिथून पळून गेला. 

सादिकची बायको मेहरुनिसाच्या तक्रारीनंतर चेंबूरच्या टिळकनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

shooting in mumbais chembur area for not wearing corona mask on face

loading image