esakal | माहिम रेल्वेस्थानकावर कोरोना वॉरिअर्सना अनोखी मानवंदना
sakal

बोलून बातमी शोधा

माहिम रेल्वेस्थानकावर कोरोना वॉरिअर्सना अनोखी मानवंदना

स्थानकावर चित्र रेखाटण्यात आली आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलिस, भाजी विक्रेते, डिलिव्हरी व्यक्ती आणि स्वच्छता कामगार ज्यांनी आपली भूमिका चोख बजावली यांचे या चित्रांद्वारे आभार मानण्यात आलेत.  

माहिम रेल्वेस्थानकावर कोरोना वॉरिअर्सना अनोखी मानवंदना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देणारे कोरोना योद्धांना माहिम रेल्वे स्थानकात अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. यासाठी स्थानकावर चित्र रेखाटण्यात आली आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलिस, भाजी विक्रेते, डिलिव्हरी व्यक्ती आणि स्वच्छता कामगार ज्यांनी आपली भूमिका चोख बजावली यांचे या चित्रांद्वारे आभार मानण्यात आलेत.  

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

'Heroes of Mumbai’म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प ‘आर्ट स्टेशन’प्रकल्पाचा विस्तार आहे. हा प्रकल्प जो हाय-फूटफॉल ट्रान्झिट स्पेस वॉक-थ्रू आर्ट गॅलरीमध्ये रूपांतरित करतो, एखाद्या गंभीर संवादासाठी जागा बनवताना सार्वजनिक जागेवर कला सादर करतात, असं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. 

हा प्रकल्प केवळ स्टेशनचे सौंदर्यीकरणच वाढवत नसून कोविड-19च्या योद्धांबद्दल ऐक्य आणि कृतज्ञता देखील व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग असल्याचं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. माहिम जंक्शन स्टेशनवर सुमारे दिड लाख सामान्य नागरिक दररोज या मार्गावरुन प्रवास करतात. 

MMRDA चं दुसरं कोविड रुग्णालय तयार; कोरोना रुग्णांना मिळतील 'या' सुविधा.. 

ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली आहे आणि आपण सुरक्षित आहोत हे सुनिश्चित करण्यासाठी स्वतःचे जीवन धोक्यात घातले, हे या Heroes of Mumbai या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. पश्चिम रेल्वे आपल्या इतर उपनगरी स्थानकांवर अशाच प्रकारचे सौंदर्यीकरण व्हावं अशी अपेक्षा करत आहे.

माहीम स्टेशनची सीमा भिंत जीर्ण अवस्थेत होती म्हणून प्रथम त्याची दुरुस्त करण्यात आली आणि नंतर पेंटिंगच्या माध्यमातून सौंदर्य वाढविण्यासाठी एशियन पेंट्स आणि सेंट + आर्ट इंडिया फाऊंडेशनशी संपर्क साधला, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. बीएमसी फूट ओव्हर ब्रिजला जोडलेला 3.6 मीटर रुंद आणि 80 मीटर लांबीचा नवीन स्काय वॉकही नुकताच महिममध्ये एमआरव्हीसीने (MRVC) बांधला आहे.

वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर म्हणाले की, माहीम स्टेशनवरील ‘हिरोज ऑफ मुंबई’ प्रकल्पानं केवळ स्टेशनचे सौंदर्यीकरणच वाढवलं नसून कोविड- 19 योद्धांबद्दल ऐक्य आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग आहे. सीएसआर उपक्रमांतर्गत या अद्भुत कलाकृतीसाठी एशियन पेंट्स आणि सेंट + आर्ट इंडिया फाऊंडेशननं भागीदारी केल्यानं अभिमान आहे. पश्चिम रेल्वेच्या विविध उपनगरी स्थानकांवर आणखी अनेक अशा प्रकारचे सौंदर्यीकरण व्हावं अशी अपेक्षा करत आहोत.

loading image