९७ वर्षांच्या आजीचा अवयवदानाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

प्रभादेवी - आयुष्यभर समाजसेवेचा वसा अंगीकारलेल्या राधाबाई सारंग यांनी ९७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सकाळ’ने सुरू केलेल्या अवयवदानाच्या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यांनीही अवयवदानाचा संकल्प केला असून, इतरांनाही त्याबाबत आवाहन केले आहे.

प्रभादेवी - आयुष्यभर समाजसेवेचा वसा अंगीकारलेल्या राधाबाई सारंग यांनी ९७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘सकाळ’ने सुरू केलेल्या अवयवदानाच्या मोहिमेला पाठिंबा दिला. त्यांनीही अवयवदानाचा संकल्प केला असून, इतरांनाही त्याबाबत आवाहन केले आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

प्रभादेवीतील प्रभा-विनायक सोसायटीत राहणाऱ्या राधाबाई आजींचा वाढदिवस गुरुवारी (ता. २९) त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहात साजरा केला. वयाच्या ९७ व्या वर्षीही आजीबाईंचे सामाजिक भान आजही कायम आहे. त्यांनी वाढदिवसाच्या सोहळ्यातच अवयवदानाचा संकल्प केला. त्यांच्या घरच्या मंडळींनीही त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले. घरची आर्थिक स्थिती साधीच असतानाही न डगमगता राधाबाईंनी आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन व्यवसायाचे बाळकडू दिले. त्यामुळेच आज उद्योगजगतात सारंग कुटुंबीयांनी आपला जम बसविला आहे. ‘सकाळ’ने सुरू केलेली अवयवदानाची मोहीम स्तुत्य आहे. मोहिमेपासून प्रेरणा घेत सारंग बंधूंनी अवयवदानाचा संकल्प केला असल्याचे राधाबाई यांचा पुत्र उद्योजक सुभाष सारंग यांनी सांगितले.

जन्मदिनीच निर्धार
‘सकाळ माध्यम समूहा’ने अवयवदान मोहीम सुरू केली तेव्हा सोसायटीतील काही तरुणांनी अवयवदानाचा संकल्प केला होता. त्यातूनच प्रेरणा घेत मीही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. जन्मदिनी कुटुंबीयांसमोर आपला संकल्प जाहीर करण्याचे ठरवले होते. लवकरच पुढील सोपस्कार पार पाडू, असे राधाबाई सारंग म्हणाल्या.

Web Title: 97 years old grandmother will organ donate