esakal | सिनेट परीक्षेबाबत सोमवारी निर्णय शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

सिनेट परीक्षेबाबत सोमवारी निर्णय शक्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई (Mumbai) विद्यापीठाची (University) सर्वसाधारण सिनेट ७ ऑक्टोबरला होत असून ती ऑफलाईन घ्यायची की ऑनलाईन, यासंबंधी अंतिम निर्णय विद्यापीठाकडून सोमवारी येण्याची शक्यता आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनमुळे विद्यापीठाच्या सर्वच सिनेट सभा ऑनलाईन पार पडल्या होत्या; मात्र यात बहुसंख्य प्रश्नांना न्याय मिळाला नाही; तर अनेक विषय प्रकर्षाने मांडण्यासाठी अडचणी आल्याने यंदाची सिनेट ऑनलाईन आणि कोरोना नियमांचे पालन करून घेण्याची मागणी सिनेट सदस्यांनी केली आहे. सिनेटच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने सिनेट सदस्य, व्यवस्थापन आणि प्राध्यापक आदी सिनेट प्रतिनिधींसाठी चहापानाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, प्रवीण पाटकर, शशिकांत झोर, मिलिंद डॉ. धनराज कोहचाडे, निखिल जाधव आणि शीतल देवरूखकर शेठ आदींनी सिनेट ऑफलाईन पद्धतीने घेतली जावी अशी मागणी केली. यासाठी युवासेनेच्या सदस्यांनी एक निवेदन कुलगुरूंना दिल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: अजित पवारांच्या कार्यक्रमाला गर्दी,150 जणांविरोधात गुन्हा दाखल

महत्त्वाच्या विषयांना न्याय आवश्यक

मागील सिनेटमध्ये विद्यापीठाकडून बृहत्आराखडा हा विषय अर्जेंड्यावर घेतला | होता; मात्र या वेळी विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आदींचे अनेक प्रश्न आणि इतर महत्त्वाचे | विषय चर्चेला येणार असल्याने त्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी ही सिनेट ऑफलाईन घेणे सर्वांच्या हिताचे ठरेल, अशी भूमिका आपण कुलगुरूंकडे मांडली असल्याचे सिनेट सदस्य डॉ. वैभव नरवडे यांनी सांगितले.

loading image
go to top