Modi In Kalyan: ठरलं तर, 'या' तारखेला मोदी गाजवणार कल्याणचं मैदान

Modi In Kalyan
Modi In Kalyansakal

Modi In Kalyan: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेते कामाला लागले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशभरात सभांचा धडाका लावला आहे. त्यांची सभा होईल तेथील उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते.(bhiwandi Loksabha news)

त्यामुळे देशातील महायुतीच्या उमेदवारांकडून पंतप्रधान मोदी यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी यासाठी मागणी असते. 10 मे रोजी कल्याण पश्चिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (maharashtra News)

Modi In Kalyan
PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

या सभेच्या माध्यमातून मोदी हे महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील व कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या 10 मे ला पंतप्रधान मोदी कल्याण पश्चिम येथे येणार असल्याची माहिती भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे. सभेची वेळ व ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.(loskabha news)

2014 साली लोकसभा निवडणूकी दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी उमेदवार खासदार कपिल पाटील व खासदार श्रीकांत शिंदे हेच होते. दोन्ही उमेदवारांनी 2014 च्या निवडणूकीत विजय मिळविला होता. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत या दोन्ही उमेदवारांनी जास्तीत जास्त मताधिक्याने विजय मिळवला होता.(modi in kalyan)

Modi In Kalyan
Maharashtra Farmers : महाराष्ट्रात चाललंय काय? तब्बल 1,300 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं; धक्कादायक अहवाल समोर

आता भिवंडी व कल्याण मतदारसंघातील हे उमेदवार आपल्या विजयाची हॅट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे कल्याण मध्ये सभा घेऊन प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे.(modi in mumbai)

तर नरेंद्र मोदी यांची सभा होण्याआधीचे भिवंडी आणि कल्याण लोकसभेचे चित्र अतिशय पोषक आहे. पण नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथल्या झंझावाताची महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल.

मोदींजींचे विचार स्वयंस्फूर्तीने जनता घेत असते, अशाप्रकारे जनता हे विचार ऐकते आणि त्यांनाही मोदींच्या विचारांची प्रेरणा मिळते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे महायुतीकडून सांगण्यात आले आहे.(bjp shivsena in kalyan)

Modi In Kalyan
Maharashtra News: राज्यातील त्या ४१ प्रवर्तकांना महारेराची नोटीस; जाणून घ्या काय आहे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com