Aaditya Thackeray : "आता मी चॅलेंज देतो येथे लढून जिंकून दाखवा", आदित्य ठाकरे यांचे खासदार शिंदे यांना थेट आव्हान

युवासेना नेते आदित्य ठाकरे यांचे खासदार शिंदे यांना कल्याण येथे ओपन चॅलेंज.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeraysakal

डोंबिवली - कल्याण येथे काल परवा जे काही घडलं त्यावर मी ऐकले की येथील जे खासदार आहेत ते स्वतःच सीट बदलण्याची चर्चा आहे. त्यांना येथून लढणार नाही यावेळी. यावेळी त्यांना मी चॅलेंज देतो की हिम्मत असेल तर कल्याण मधून लढून दाखवा आणि जिंकून दाखवा असे म्हणत युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी कल्याण येथे येत येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ओपन चॅलेंज देऊ केले आहे.

तसेच महाराष्ट्रात एवढी भया व परिस्थिती आहे की नवीन उद्योजक येताना येथे विचार करत आहेत गँगस्टरच मुख्यमंत्री म्हणून बसले असतील तर न्याय मागेच कोणाकडे असे म्हणत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना देखील लक्ष केले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शाखेला युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. यावेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई, खासदार राजन विचारे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी खासदार शिंदे यांच्यावर निशाणा साधताना आज मला कोल्ड कॉफी कोण देणार असा टोला हाणताना आताचे जे विद्यमान खासदार आहे. ते मला कोल्ड कॉफी द्यायचे.

येताना मी तो विचार करत होतो की आज मला कोण कोल्ड कॉफी देणार. मी ऐकलं ते लढणारच नाही यावेळी त्यांना मी चॅलेंज देतो की हिम्मत असेल तर कल्याण मधून लढून दाखवा आणि जिंकून दाखवा कारण इथून जिंकला तो शिवसैनिक आणि आपलाच जिंकणार.

पोलिसांची पण परिस्थिती बिकट करून ठेवली आहे. हिललाईन पोलीस स्टेशन मधील फायरिंग चे फुटेज बाहेर आलं व माहीम मधल फुटेज का बाहेर आल नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एक तर भाजपची इथे गळचेपी करत आहेत. आणि जे भाजप तुम्ही बांधायला निघाले होतात. महाराष्ट्रात पुणे, कल्याण, ठाणे मध्ये असेल जो भाजपसाठी तुम्ही विचार करत होता, स्वप्न बघत होता त्याचा आता झालं तरी काय?

गेले काही वर्षे येथे भाजपसोबत पिता पुत्रांचे खेळ चालायचे. इथले आमदार जे आता मंत्री झालेत अस म्हणत त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना देखील टार्गेट केले. आपले सरकारच्या वेळी त्यांच एवढेच म्हणण्यात आल हा फंड रद्द केला, अमुक माणूस फोडला, तमुक माणूस फोडला. आज मी त्या भाजप, संघ वाल्यानं विचारतो की येथे भाजपची गळचेपी होते की नाही.

यांनी स्वतःच अंगावर खेचून घेतला आहे त्यांना. तेच पुण्यामध्ये झालेले आहे. एवढे वर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात तेथे ते लढले आणि आता तेथे पालकमंत्री कोण बसवला आहे. मग कशासाठी तुम्ही लढत आहात, कोणासाठी लढत आहात महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी हे चित्र बेकार होत चाललं आहे अस आदित्य म्हणाले.

महाराष्ट्रात परिस्थिती एवढी भयानक होत आहे. नवीन उद्योजक येथे येताना विचार करत आहेत. की आपल्या राज्यात उद्योग आणायचे की नाही. कारण गँगस्टर लीडरच जर मुख्यमंत्री म्हणून बसले असतील तर तुम्ही जाणार कोणाकडे आणि नाय कोणाकडे मागणार अशी परिस्थिती आहे.

कल्याण लोकसभेतील भाजप व शिंदे गटाच्या वादावरून भाजपची किव येते मला असे म्हटले आहे. पिता-पुत्र येथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण गेल्या दोन वर्षात पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. येथे भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर आता गोळीबार झाला आहे हे किती दिवस आम्ही सहन करायचे असे देखील आदित्य हे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com