Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’
Aaditya Thackeray Breaks Silence On Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयची नवी चौकशी सुरू असताना आदित्य ठाकरे यांची सविस्तर सोशल मीडिया पोस्ट; सहा वर्षांपासून पुराव्याविना नाव जोडल्याचा आरोप
मुंबई : ‘मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा माझी त्यांच्याशी कोणतीही ओळख नव्हती,’ असे स्पष्ट करत शिवसेना (यूबीटी) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर पोस्ट लिहून आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.