Shivsena: आदित्य ठाकरेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी; युवासेनेचा नेता ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray Rahul Kanal
आदित्य ठाकरेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी; युवासेनेचा नेता ट्रोल

Shivsena: आदित्य ठाकरेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी; युवासेनेचा नेता ट्रोल

युवासेना नेते राहुल कनाल आता एका नव्या वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर त्यांना त्यांच्या एका ट्वीटमुळे जोरदार ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे त्यांना त्यांचं हे ट्वीटही डिलीट करावं लागलंय. असं काय होतं त्या ट्वीटमध्ये?

राहुल कनाल यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये आदित्य ठाकरेंचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत मिक्स करण्यात आला होता. जणू आदित्य ठाकरे शिवाजी महाराजांच्या स्थानी आहेत, अशा प्रकारचा हा फोटो दाखवण्यात आला होता. त्यावरुन सोशल मीडियावरुन तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्यानंतर आता कनाल यांनी हे ट्वीट हटवलं असून या ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे.

ट्वीट करत राहुल कनाल याविषयी म्हणतात, "कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. फोटोग्राफरचं कौतुक तर आहेच पण आदित्य ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊनच पुढे जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहे. मला ट्रोल्सचा सामना करण्याची भीती वाटत नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे आणि आमच्यासाठी संस्कृती सर्व काही आहे, माझा हेतू चांगला होता आणि जर सामान्य नागरिकांना ते आवडत नसेल तर मी एक जबाबदार नागरिक आहे आणि कोणालाही दुखवायचे नाही पण एक गोष्ट मात्र आहे की, आपण सर्व महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहोत. आणखी एक गोष्ट, मी केलेलं कोणतंही चांगलं वाईट कृत्य हे माझं वैयक्तिक आहे. कोणालाही त्यावरुन माझ्या नेत्याला बोलण्याचा हक्क नाही. ते माझे आदर्श आहेत आणि मी त्यांना कायमच महात्म्यांकडून प्रेरणा घेतल्याचं पाहिलं आहे".

Web Title: Aaditya Thackeray Shivsena Yuvasena Chhatrapati Shivaji Maharaj Trolled On Twitter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..