"आई साई मित्र मंडळा'ची माणुसकीचा हंडी

कोल्हापूर ः पूरग्रस्तांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या मदतीचे वाटप करताना आई साई मित्र मंडळाचे कार्यकर्ते.
कोल्हापूर ः पूरग्रस्तांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या मदतीचे वाटप करताना आई साई मित्र मंडळाचे कार्यकर्ते.

नालासोपारा : राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरस्थितीने लाखोंचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. या कुटुंबांना नव्याने संसार उभारण्यात हातभार लावण्यासह सामाजिक बांधिलकी म्हणून विरारमधील "आई साई मित्र मंडळा'ने यंदाचा दहीकाला उत्सव रद्द करून एक टेम्पो भरून विविध वस्तुरूपी मदत पूरग्रस्तांना पाठवली आहे. 

विरार पश्‍चिम डोंगरीपाडा आग्री चौक येथे आई साई मित्र मंडळ आहे. या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भोईर, उपाध्यक्ष भूपेंद्र भोईर, सल्लागार धीरेंद्र किशोर पाटील, प्रवीण अनंत पाटील, दीपक अनंत पाटील, मुकुल सचिन सोनार यांच्यासह परिसरातील 150 च्या वर तरुण सभासदांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंडळातर्फे तरुणांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि त्यांच्यात समाजाविषयी आत्मीयता निर्माण होण्यासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी राबविले जातात. त्यातीलच मंडळाचा दहीकाला सार्वजनिक उत्सवही महत्त्वाचा असतो; मात्र यंदा राज्यातील पूरस्थिती संकट लक्षात घेत यंदाचा दहीकाला सार्वजनिक उत्सव रद्द करून त्याची जमा झालेली रक्कम, मंडळातील कार्यकर्त्यांनी काढलेली वर्गणी एकत्र करून पूरग्रस्तांना टेम्पो भरून मदत नेऊन कोल्हापूर येथे वाटण्यात आली आहे.

यामध्ये जीवनावश्‍यक वस्तू, औधषे, तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, मूग, वाटणे, साखर, तेल, मसाले, हळद, चॉकलेट, बिस्किट, साबण, टॉवेल, ब्लॅंकेट, चटई, पॅन्ट, महिलांसाठी ड्रेस आणि साडी आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तू बाजार बोगाव, आंबेवाडी, नेबापूर, चिखली, पढाली, निगावे या गावातील पूरग्रस्तांना देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सल्लागार धीरेंद्र पाटील यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com