YES बँक ग्राहकांनी आता सर्वात आधी 'हे' करा, नाहीतर पुढे अजून त्रास होईल...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

मुंबई : सध्या देशात आर्थिक मंदीची प्रचंड लाट आहे. अशातच मोठ्या आणि नामवंत बँका डबघाईला येताना दिसत आहेत. आधी PMC बँक आणि आता Yes बँकला याचा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी Yes बँकेनं आपल्या ग्राहकांना धक्का दिला होता. Yes बँकेतून ग्राहकांना ५०,००० रुपयेच काढता येतील असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे  ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

मुंबई : सध्या देशात आर्थिक मंदीची प्रचंड लाट आहे. अशातच मोठ्या आणि नामवंत बँका डबघाईला येताना दिसत आहेत. आधी PMC बँक आणि आता Yes बँकला याचा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी Yes बँकेनं आपल्या ग्राहकांना धक्का दिला होता. Yes बँकेतून ग्राहकांना ५०,००० रुपयेच काढता येतील असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे  ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

बँकेच्या या निर्णयामुळे बँक बुडणार की काय ? त्यासोबत ग्राहकांचे पैसेही बुडणार का? अशी भीती ग्राहकांच्या मनात आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत असं सांगितलं होतं. मात्र ग्राहकांचे व्यवहार Yes बॅंकेमुळे  खोळंबले आहेत.

Yes बँकेला आर्थिक डबघाईतून वाचवण्यासाठी काही दिवसांआधी स्टेट बँक ऑफ इंडियानं पुढाकार घेतला होता. स्टेट बँक ऑफ इंडिया तब्बल २५०० कोटी रुपये Yes बँकेत गुंतवणार असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना घाबरण्याचं काहीही कारण नाही असं काही अर्थ तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. 

मात्र तुमचं खातं जर Yes बँकेत आहे तर घाबरून जाऊ नका. पुढे दिलेले उपाय पहिले करा आणि आपले पैसे सुरक्षित ठेवा.

कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती...

(१) तुमचे ECS आदेश बदला: .

ECS म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्विस. याचा अर्थ तुमच्या खात्याशी निगडित असलेले EMI, SIP आणि इतर काही पैशांचे व्यवहार तातडीनं बदला. ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुमच्याच खात्यात राहतील. 

(२) काही तात्पुरती व्यवस्था शोधा:

लक्षात ठेवा ECS ब्लॉक केल्यामुळे तुमचे EMI जाणार नाहीत. ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. म्हणून EMI साठी तात्पुरत्या दुसऱ्या सेवेचा उपयोग करा. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी क्रेडिट ब्युरोला सूचित करा. जर तुम्हाला इन्शुरन्स भरायचा आहे तर काळजी करू नका. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला दुसऱ्या खात्यातूनही प्रीमियम भरण्याची परवानगी देते. 

(३) अप्लिकेशनमधून खातं काढून टाका: 

अनेकदा तुमचं खातं स्वीगी, फोनपे किंवा ओला अशा प्रकारच्या अप्लिकेशनशी जोडलेलं असतं. मात्र  जोडलेली खाती काढून टाका. कोणत्याही प्रकारचे UPI पेमेंट करू नका.

जमिनीवरच सतरंजी पसरवून आमदार साहेब झालेत गुडूप, कार्यकर्ते आश्चर्यचकित !

(४) तुमच्या HR सोबत बोला:

जर तुमच्या कंपनीचे सर्व खाते Yes बँकमध्ये असेल तर तुमच्या येणाऱ्या पगाराबाबत तुमच्या HR सोबत संपर्क करा. अशा कंपन्यांकडून तुम्हाला दुसरी व्यवस्था करून दिली जाईल याची काळजी घ्या. ज्यामुळे तुमचा पुढचा पगार थांबून राहणार नाही. 

आता Yes बँक कधी या सगळ्यातून कधी सावरणार ? सरकार यासाठी काही प्रयत्न करणार का? आणि ग्राहकांना कधी दिलासा मिळणार? हेच बघणं महत्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही वरील गोष्टी करून ठेवा. 

know how to save your money if your account is in YES bank read full story 
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know how to save your money if your account is in YES bank read full story