"कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय"; नवनीत राणांचं पेडणेकरांवर टीकास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana_Kishori Pednekar

"कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय"; राणांचं पेडणेकरांवर टीकास्त्र

मुंबई : नवनीत राणा यांचे लिलावती हॉस्पिटलमधील एमआरआय रुममधील फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी आता राणांनी शिवसेनेवर टीका केली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांकडे तपासण्यांच्या रिपोर्टबाबत विचारणा करणाऱ्या शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. कम्पाऊंडर महिला डॉक्टरांकडे विचारणा करतेय, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला. (compounder asks the doctor about treatment Navneet Rana slams on Kishori Pednekar)

हेही वाचा: 'लिलावती'च्या MRI रुममधील फोटो कोणी केले व्हायरल?; राजेश टोपेंचा इशारा

राणा म्हणाल्या, लिलावती हे एक जुनं हॉस्पिटल आहे. मी जेव्हा लिलावतीमध्ये होते तेव्हा जे फोटो व्हायरल झाले तसे फोटो आत्तापर्यंत अनेकदा व्हायरल झालेले आहेत. जर मी पोलिस कस्टडीत असते आणि तिथून मला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं असतं आणि त्यानंतर ते फोटो व्हायरल झाले असते तर पोलीस विभागाला रुग्णालयाकडे चौकशीचे अधिकार असू शकतात. पण हा अधिकार पोलीस विभागाचा आहे मुंबई महापालिकेचा नाही.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच राणा दाम्पत्याची महाआरती, दिल्लीतून घोषणा

त्याचबरोबर ज्या पद्धतीनं एक महिला दुसऱ्या महिलेच्या वैयक्तिक तपासण्या आणि त्यावरील उपचारांबाबत विचारणा करण्याचा अधिकार या देशात अद्याप कोणालाही देण्यात आलेला नाही. पण त्याविरोधात उद्धव ठाकरे काम करत आहेत. शिवसेनेच्या एक महिला ज्या स्वतः कंपाऊंडर आहेत त्या रुग्णालयात जाऊन संबंधीत विभागाला त्रास देत आहेत. डॉक्टरांना प्रश्नोत्तर विचारत आहेत. त्या स्वतः कंपाऊंडर आहेत आणि डॉक्टरांकडे विचारणा करत आहेत की ते काय ट्रिटमेंट करत आहेत. यावर मला हसू आलं तसेच दुखही झालं की एक महिला दुसऱ्या महिलेच्या वैयक्तिक बाबींवर खुलेपणानं चर्चा करते. एमआरआय, ट्रिटमेंट याची माहिती मागवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? असा सवालही यावेळी नवनीत राणा यांनी विचारला.

उद्धव ठाकरेंनी आधी त्यांनी कागदपत्रे द्यावीत मग...

उद्धव ठाकरे आपली पातळी सोडून वागले आहेत, हॉस्पिटलमध्ये आपली माणसं पाठवून त्यांनी आणखीनच आपली पातळी कमी करुन घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा त्यांच्या आजारावरील उपचारांची कागदपत्रं मला द्यावीत. मग मी माझ्या आजाराबाबतची कागदपत्रे देईल, मला कुठल्या उपचारांची गरज आहे हे मी सांगेन, असंही यावेळी राणा यांनी म्हटलं आहे.

Web Title: Compounder Asks The Doctor About Treatment Navneet Rana Slams On Kishori Pednekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top