Thane Water Supply: अन्यथा अर्धनग्न होऊन आंघोळ करू, आम आदमी पक्षाचा ठाणे महापालिकेला इशारा

Thane Municipal Corporation: ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे ही पाणीटंचाई सोडवा अन्यथा अर्धनग्न होऊन आंघोळ करण्याचा इशारा दिला.
Thane Municipal Corporation

Thane Municipal Corporation

ESakal

Updated on

ठाणे : महापालिका क्षेत्रातील विविध परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अशातच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पौंडपाडा, पवनपाडा भागातही महिन्यात केवळ चार वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याने संतापलेल्या नागरिकांसह आम आदमी पक्षाने सोमवारी (ता. ४) पालिका मुख्यालयावर धडक दिली. या वेळी पाणीप्रश्न सोडवा अन्यथा अर्धनग्न होऊन अंघोळ करू, असा इशारा पालिका प्रशासनाला दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com