esakal | आम आदमी पक्षाचा आंदोलनचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

आम आदमी पक्षाचा आंदोलनचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालाड : मालवणीतील प्रवेशद्वार क्रमांक आठ अंबोजवाडी येथील समस्यांबावत आम आदमी पक्ष लवकरच आंदोलन छेडणार आहे. तसा इशारा पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षा लारझी व्हर्गिस यांनी दिला आहे.

अंबोजवाडीत पाणी, कचरा यांची समस्या आहे. नागरिक या समस्यांनी हैराण झाले आहेत. शिवाय पालिकेचा दवाखाना नसल्याने येथून नागरिकांना मालवणी गेट क्रमांक सहा येथे उपचाराकरिता जावे लागते. तसेच येथील अधिकाधिक रस्ते कच्चे असल्याने पावसाच्या चिखल होतो.

हेही वाचा: सानपाडा येथील बालरोगतज्ज्ञाची आत्महत्या

या समस्यांमुळे येथील नागरिकांचा जगणे कठीण झाले आहे. या ठिकाणी पालिकेचे दुर्लक्ष होत असून याबाबत अनेक वेळा आंदोलन करूनसुद्धा समस्या मुटलेल्या नाहीत. म्हणूनच आम आदमी पक्षाच्या प्रभाग क्रमांक ४९ च्या वॉर्ड अध्यक्षा लारझो व्हर्गिस यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्याचा दिला आहे. इशारा त्यांनी

loading image
go to top