आंबिवली रेल्वे स्थानकाची दुरावस्था

रविंद्र खरात
सोमवार, 21 मे 2018

कल्याण - मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकातुन प्रवास करताना प्रवाश्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या स्थानकाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे. 

मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकाला दिवसेंदिवस महत्व प्राप्त होत आहे. या रेल्वे स्थानकात कसाऱ्याच्या दिशेने भारतीय लष्कराच्या 39 जवानांनी पादचारी पूल बांधल्याने या रेल्वे स्थानकाला महत्व प्राप्त झाले आहे. कसारा आणि मुंबईच्या दिशेने प्रत्येक दिवशी अंदाजे 30 हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना काय सुविधा मिळते हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. 

या रेल्वे स्थानकात कसाऱ्याच्या दिशेने फलाटावरिल शेड आणि पत्रे काढले होते. तर शौचालय ही तोडले होते. पादचारी पूल बांधून झाल्यानंतर रेल्वे स्थानकात शेड आणि त्यावर पत्रे बांधणे गरजेचे होते. मात्र कुठलीही उपाययोजना केली नसल्याने प्रवाश्याना रखरखत्या कडक उन्हात प्रवास करावा लागतो. तर अनेक जण पादचारी पुलाचा सहारा घेतात आणि लोकल आल्यावर धावपळ करत ती लोकल पकडतात. मात्र यावेळी अनेक जण पाय घसरून पडल्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. पावसाळ्यात ही कामे पूर्ण न झाल्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. 

दरम्यान, पादचारी पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याने शौचालय तोडण्यात आले. पर्यायी शौचालय बांधले आहे. मात्र त्याची दुरावस्था झाली असून, त्याचा त्रास प्रवाश्याना होत आहे. रेल्वे स्थानकाबाहेर सांडपाणी जात असल्याने तेथील रिक्षा चालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही दिवसात पावसाळा सूरु होत असून त्वरित उपाययोजना अशी मागणी होत आहे.

आंबिवली रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधणे गरजेचे होते मात्र त्यासाठी शेड आणि शौचालय तोडले. पूल बांधून पूर्ण झाल्यावर ही कामे होणे आवश्यक होती. मात्र ते पूर्ण न झाल्याने प्रवाश्यांना नाहक त्रास होत असून, पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे आवश्यक आहे अशी मागणी रेल्वे प्रवासी रोशन जाधव यांनी केली आहे.

पावसाळ्यापूर्वी मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकात दुरुस्तीची कामे सुरू असून, आंबिवली रेल्वे स्थानकातील ही कामे मार्गी लागतील अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली. 

Web Title: Aambivli railway station Deterioration