
Kabutar khana
ESakal
मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी (ता. १५) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन करताना मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबुतरखाने उभारले जातील, अशी घोषणा केली. त्यानंतर आता ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने जेथे जेथे कबुतरखाने उभारले जातील तेथे तेथे चिकन-मटण सेंटर उभारण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून, मराठी विरुद्ध जैन असा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.