AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

AAP’s Strategy for BMC Election : २१ जणांची पहिली उमेदवारी यादीही केली जाहीर; जाणून घ्या, काय केले आहेत आरोप?
Aam Aadmi Party Contest Mumbai Municipal Election

Aam Aadmi Party Contest Mumbai Municipal Election

esakal

Updated on

Aam Aadmi Party to Contest All BMC Seats : आम आदमी पक्षाने आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची निर्णय घेतला आहे. आज (शुक्रवार) पक्षाकडून याबाबत घोषणाही करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व २२७ वॉर्डांमध्ये पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करेल आणि कोणत्याही युतीत सामील होणार नाही.

यावेळी आम आदमी पार्टीकडून आरोप करण्यात आला की, मुंबईची अवस्था वाईट आहे आणि सर्व पक्षांनी बीएमसीला लुटले आहे. म्हणून मुंबईला भारतातील सर्वात तरुण राष्ट्रीय पक्ष, आपची गरज आहे. एवढंच नाहीतर यावेळी आम आदम पार्टीने आपल्या २१ उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली.

आम आदमी पक्षाने म्हटले की, भारतातील आघाडीचे शहर असूनही, मुंबईची अवस्था वाईट आहे. बीएमसीचे वार्षिक बजेट ७४ हजार ४४७ कोटी आहे, जे आशियातील सर्वाधिक आहे. मुंबईकर देशात सर्वाधिक कर भरतात, तरीही त्यांना निकृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सेवा मिळतात.

Aam Aadmi Party Contest Mumbai Municipal Election
Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

याशिवाय प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत आपने म्हटले आहे की, वृक्षाच्छादनातील झपाट्याने घट झाल्यामुळे पर्यावरणीय दर्जा खालावला आहे. प्रदूषण सर्वकालीन उच्चांकावर आहे. तसेच असाही आरोप केला की, बीएमसी भ्रष्टाचार आणि अक्षमतेचा अड्डा बनली आहे. बीएमसी शाळा बंद पडत आहेत, शिक्षणाचा दर्जा खराब आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे अस्तित्वात नाहीत. आणि बसेसची संख्या कमी करून बेस्टला पद्धतशीरपणे संपवले जात आहे. शहरातील कचरा विल्हेवाट लावण्याची व्यवस्था खराब आहे आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com