Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

Baba Bageshwar Dham’s Dhirendra Shastri warning : पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादेत तयार होत असलेल्या बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर स्पष्ट केली भूमिका
Baba Bageshwar Dham leader Dhirendra Shastri’s

Baba Bageshwar Dham leader Dhirendra Shastri’s

esakal

Updated on

Latest update on the Murshidabad Babri Mosque issue : मुर्शिदाबाद पुन्हा एकदा बंगालच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी झालेल्या ठिकाणी हजारो लोक शुक्रवारीच्या नमाजला उपस्थित होते. यावेळी मशिदीची पायाभरणी करणारे तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर देखील उपस्थित होते. सध्या बाबरच्या नावावरून बंगालमध्ये राजकीय गोंधळ सुरू आहे.  

बाबरच्या नावाने तयार होत असलेल्या या मशिदीच्या बांधकामावर देशभरातील विविध राज्यांतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बागेश्वर बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बाबरी मशिदीच्या बांधकामाविरुद्ध इशारा दिला आहे. त्यांनी काय म्हटले ते जाणून घेऊया.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये बांधल्या जाणाऱ्या बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "या देशात बाबरी मशिदीची पुनर्बांधणी करण्याचे प्रयत्न होत आहेत हे दुर्दैवी आहे. पण मी हे नक्की सांगेन की जर असे झाले तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत.’’

Baba Bageshwar Dham leader Dhirendra Shastri’s
Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

तसेच ‘’हे परकीय आक्रमकांचे हिंदूंविरुद्धचे षड्यंत्र आहे. जेव्हा बाबरीची चर्चा झाली तेव्हा आम्ही बंगालमध्ये गेलो. कारण जर बाबरी बांधली गेली तर बाबा येतील. बंगालपासून काश्मीरपर्यंत हिंदूंविरुद्ध बोलणाऱ्यांना लवकरच योग्य उत्तर दिले जाईल.’’ असा इशाराही यावेळी बाबा बागेश्वर यांनी दिला.

Baba Bageshwar Dham leader Dhirendra Shastri’s
Hijab Controversy Update : हिजाब विवादात नवीन अपडेट!, नुसरत परवीन नोकरी करणार, कुटुंबही नाराज नाही

तर हुमायूं कबीर यांनी दावा केला आहे की, मुर्शिदाबादमध्ये बाबरच्या नावावर जी मशीद बनवली जात आहे. त्यासाठी आतापर्यंत तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यांनी म्हटले की बाबरी नावाशी देशभरातील मुस्लिम जुडत आहेत. एवढंच नाहीतर बाबरी मशीद बनवण्यासाठी हुमांयू कबीर यांनी तब्बल ३०० कोटी रुपये लावणार असल्याचेही म्हटले आहे.

Baba Bageshwar Dham leader Dhirendra Shastri’s
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

तृणमूल काँग्रेसमधून निलंबित झालेले आमदार हुमांयू कबीर यांनी नवीन पक्ष निर्माण करण्याचीही घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, २२ डिसेंबर रोजी ते नवीन पार्टी बनवणार आहेत. ते आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल जागांवर उमेदवार उभा करू इच्छित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com