आपची राज्य कार्यकारिणी 6 जूनला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

आम आदमी पक्षाने दिल्ली, हरियाना आणि पंजाबनंतर महाराष्ट्रात विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंदखेड राजा येथे येऊन जाहीर सभा घेतली. त्यानंतर राज्यात आम आदमी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर राज्याचे समन्वयक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊन राज्यव्यापी दौरा केला. 

मुंबई - आम आदमी पक्षाने दिल्ली, हरियाना आणि पंजाबनंतर महाराष्ट्रात विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंदखेड राजा येथे येऊन जाहीर सभा घेतली. त्यानंतर राज्यात आम आदमी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर राज्याचे समन्वयक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊन राज्यव्यापी दौरा केला. 

आता राज्यातील पक्षाची कार्यकारिणी आणि विविध समिती सदस्यांची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून केली जाणार आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, 6 जूनला आम आदमी पक्षाच्या समित्या व पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाईल. त्यानंतर राज्यात पक्ष संघठन मजबूत करणे व जनसामान्यांच्या मूलभूत विषयांना घेऊन न्याय देण्याचा अजेंडा आखला जाईल. आम आदमी पक्षाच्या राज्य कार्यकारिणी व समित्यांमध्ये नवे चेहरे, माजी सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. 

Web Title: AAP State meeting on 6th June